घरपालघरमहिला उद्योग केंद्रात ठेकेदारांचे उद्योग

महिला उद्योग केंद्रात ठेकेदारांचे उद्योग

Subscribe

औषध फवारणी करणारे उजाला लेबर कॉन्ट्रक्टर व किरण कॉर्पोरेशन हे ठेकेदार बिनधास्त करत आहेत. विशेष म्हणजे अपेक्षित असलेले भाडेही महापालिका या ठेकेदारांकडून वसूल करत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वसईः महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा, त्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, महिलांना आर्थिक संपन्न होता यावे, अशा बहुउद्देशातून तत्कालिन विरार नगरपरिषदेने विरारमधील मनवेल पाडा येथे महिला उद्योग केंद्राची निर्मिती केली होती. या केंद्रातील गाळे नाममात्र शुल्कात महिलांना देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न होता. वसई-विरार महापालिका स्थापनेनंतर या उद्योग केंद्राची मालकी महापालिकेकडे आली आहे. मात्र या उद्योग केंद्राला नवसंजीवनी देण्याऐवजी महापालिकेने या केंद्रातील गाळे सफाई ठेकेदारांना मोफत वापरासाठी दिल्याने महापालिकेविरोधात संपात व्यक्त केला जात आहे.

विरारमधील मनवेल पाडा येथे असलेल्या या महिला उद्योग केंद्रातील बहुतांश गाळे सद्यस्थितीत बंद आहेत. देखभाल-दुरुस्तीअभावी या केंद्राला अवकळा आलेली आहे. त्यामुळे या केंद्राला नवसंजीवनी देऊन या इमारतीचा पुनर्वापर महिलांना करू द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. मात्र महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे अद्याप या इमारतीचे महाहस्तांतरण महापालिकेकडे झालेले नाही. विशेष म्हणजे तत्कालिन विरार नगरपरिषदेने बांधलेल्या या इमारतीची कागदपत्रेही पालिकेच्या दफ्तरी सापडत नसल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे अपवाद वगळता पडिक असलेल्या या इमारतीचा वापर महापालिका क्षेत्रातील घनकचरा संकलन व औषध फवारणी करणारे उजाला लेबर कॉन्ट्रक्टर व किरण कॉर्पोरेशन हे ठेकेदार बिनधास्त करत आहेत. विशेष म्हणजे अपेक्षित असलेले भाडेही महापालिका या ठेकेदारांकडून वसूल करत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रभाग समिती ‘अ ते ‘आयमध्ये दैनंदिन रस्तेसफाई, गटारसफाई, कचरा संकलन या दैनंदिन स्वच्छतेच्या कामाकरता २० झोन तयार करून २० ठेकेदारांची नेमणूक केली आहे. कचरा संकलन कामावर पालिका महिनाकाठी १४ कोटी रुपये खर्च करते. विरार-मनवेल पाडा हा भाग ‘ब प्रभाग समितीत येतो. या प्रभागात झोन-२ व ३ असून, येथील कचरा संकलनाचा ठेका उजाला लेबर कॉन्ट्रक्टर यांना देण्यात आलेला आहे. तर औषध फवारणीचा ठेका किरण कॉर्पोरेशन यांच्याकडे आहे. कामगारांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्याची जबाबदारी ठेकेदारांची असताना हे दोन्ही ठेकेदार मात्र बिनधास्त महापालिकेच्या महिला उद्योग केंद्राचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे यातील उजाला लेबर कॉन्ट्रक्टर ही कंपनी वसई-विरार महापालिकेत वादगस्त ठरलेल्या सुधाकर संख्ये यांची असल्याचे महापालिकेतील कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

०००

- Advertisement -

कोण आहेत सुधाकर संख्ये?

 

सुधाकर संख्ये हे वसई-विरार महापालिकेत प्रभारी सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत होते. आपल्या पदाचा गैरवापर करत महापालिकेतील बहुतांश कामांचा ठेका त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आरोपांमुळे तत्कालिन आयुक्त सतीश लोखंडे यांनी त्यांना दोनवेळा निलंबितही केले होते. याशिवाय त्यांनी केलेली अनधिकृत बांधकामे भुईसपाट करून लोखंडे यांनी त्यांना दणका दिला होता. कोविड संक्रमणाच्या सुरुवातीच्या दिवसांत सफाई कर्मचारी येत नाहीत म्हणून उजाला लेबर कॉन्ट्रक्टरने विरार-मनवेल पाडा परिसरात आठ दिवस कचरा संकलन केले नव्हते. त्याकाळात फोनही उचलत नसल्याने आरोग्य निरीक्षकांनी त्यांच्याविरोधात तक्रारीही केलेल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी सुधाकर संख्ये महापालिका सेवेतून निवृत्त झाले असले तरी साफसफाईच्या ठेक्यातील त्यांची मक्तेदारी महापालिकेने कायम ठेवलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -