घरपालघरअरेच्चा ! नवरीने केली तब्बल नऊ लग्ने

अरेच्चा ! नवरीने केली तब्बल नऊ लग्ने

Subscribe

लग्नानंतर फिर्यादीसोबत बिंदुकुमारी दोन वर्षे नालासोपारा येथील घरी राहिली होती. मात्र, त्यानंतर बिंदुकुमारी फिर्यादीलाच मारहाण करत होती. सासरच्या लोकांशी भांडण करत होती. त्यामुळे फिर्यादीने लग्न लावून देणाऱ्या रतिलाल, प्रकाश, करु आणि  मनुभाईकडे तक्रार केली.

वसईः बोगस लग्न करून लुटणाऱ्या टोळीविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात नवरीने तब्बल नऊ लग्ने करून साथिदारांच्या मदतीने ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याचेही उजेडात आले आहे. नालासोपारा येथे राहणाऱ्या एका अडतीस वर्षीय इसमासाठी रतिलाल लब्दीया (३०, रा. लालपूर, जि. जामनगर, गुजरात), प्रकाश लब्दीया (२७, रा. लालपूर, जि. जामनगर, गुजरात) आणि मनुभाई भोगवाना (५८, रा. लालपूर, जि. जामनगर, गुजरात), करु गोविंदलाल ध्रुर्व (६७, रा. पोरबंदर, गुजरात)  यांनी लग्नासाठी बिंदुकुमारी (३०, रा. भोरबापाडा, बोरीवली, मुंबई) हिचा प्रस्ताव आणला होता. त्यानंतर जामनगर येथील शिवमंदिरात फिर्यादी आणि बिंदुकुमारी प्रेमचंद शर्मा हिचे लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर रतिलाल, प्रकाश आणि मनुभाई यांनी दलाली म्हणून फिर्यादीकडून सात हजार रुपये घेतले होते.

लग्नानंतर फिर्यादीसोबत बिंदुकुमारी दोन वर्षे नालासोपारा येथील घरी राहिली होती. मात्र, त्यानंतर बिंदुकुमारी फिर्यादीलाच मारहाण करत होती. सासरच्या लोकांशी भांडण करत होती. त्यामुळे फिर्यादीने लग्न लावून देणाऱ्या रतिलाल, प्रकाश, करु आणि  मनुभाईकडे तक्रार केली. त्यावेळी तिघांनीही बिंदुकुमारी दुसरे लग्न करणार असून घटस्फोट पाहिजे असेल तर पत्तीस लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगत पैसे दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने चौघांनी साडेआठ लाख रुपये रोख आणि 1 लाख ८४ हजार रुपयांचे दागिने दिले. त्यानंतरही बिंदुकुमारीसह रतीलाल, प्रकाश, करु आणि मनुभाई यांनी धमक्या देत फिर्यादीकडे दहा  लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने जामनगरला चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती हाती लागली. ही टोळी बिंदुकुमारीचे लग्न लावायचे असल्याचे सांगत दूरच्या लोकांना जाळ्यात ओढत. लग्न लावून दिल्यानंतर नवरदेवाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळत असे. त्यासाठ लग्नाची खोटी प्रमाणपत्रेही ही टोळी बनवत असे. अशा पध्दतीने टोळीने बिंदुकुमारीची नऊ लग्ने केल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने थेट न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -