घरपालघरपालघर जिल्ह्याला ’लम्पी’ साठी एक कोटींचा निधी

पालघर जिल्ह्याला ’लम्पी’ साठी एक कोटींचा निधी

Subscribe

या लम्पी त्वचा रोगाचा प्रसार पाहता राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे लम्पी त्वचा रोग नियंत्रणात आणण्यास पशुसंवर्धन विभागास यश येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पालघर: संपूर्ण राज्यभरात लम्पी रोगांने थैमान घातले असून या रोगाच्या शिरकाव पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यात झाला असून अद्यापपर्यंत बारा जनावर बाधित झाली आहेत. या आजाराने जनावर मृत्यमुखी पडल्यास जिल्ह्याकरिता नुकसान भरपाई म्हणून एक कोटीचा निधी प्राप्त झाल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे पशुंना लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ७ केंद्रबिंदू असून एकूण १२ जनावरे बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वप्रथम वाडा तालुक्यात लम्पी आजाराचे बाधित जनावर सापडल्यानंतर पालघर, तलासरी, मोखाडा, वसई अशा पाच तालुक्यात एकूण १२ जनावरे ह्या आजाराने बाधित झाल्याचे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे. जिल्ह्याला एकूण ७० हजार लसी प्राप्त झाल्या असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १४ हजार २६७ जनावरांचे लसीकरणाचे इष्टक काम पूर्ण झालेले आहे. लसीकरण ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या लम्पी त्वचा रोगाचा प्रसार पाहता राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे लम्पी त्वचा रोग नियंत्रणात आणण्यास पशुसंवर्धन विभागास यश येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

चौकट
पालघर जिल्ह्यात एकूण २ लाख ३८ हजार ४०४ इतके पशुधन असून डहाणू तालुक्यात ७११३५, जव्हार ४२७४१, मोखाडा २१७१०, पालघर १९५१८, तलासरी ३१९३३, वाडा २२०७४, वसई ग्रा.२५३१ (वसई विरार महानगर पालिका १४५४) आणि विक्रमगड २५३०८ अशी संख्या आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -