वसईः मीरा- भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेल कक्षाने गेल्या आठ महिन्यांत ऑनलाईन फसवणूक झालेल्या गुन्ह्यांमधील ६५ गुन्ह्यांचा माग काढत तब्बल 1 कोटी 1 लाख रुपये तक्रारदाराला परत मिळवून दिले आहेत. तर गेल्या वर्षभरात ऑनलाईन फसवणुकीतील ९१ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली होती. सध्या सर्वत्रच ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढलेले आहे. मीरा- भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयात सायबर गुन्हे शाखेकडे १ जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन फसवणुकीच्या १ हजार ९५२ तक्रारी आल्या होत्या. याची गंभीरपणे दखल घेत ज्या पेमेंट गेटवे, शॉपिंग वेबसाईट, गेमिंग वेबसाईट, बँकांमध्ये वर्ग झाली होती. त्यांच्याशी पत्रव्यवहार करून समन्वय साधत ६५ तक्रारींचा छडा १ कोटी 1 लाख रुपये मिळवून ते तक्रारदारांना परत केले आहेत. तक्रारदारांना मोठ्या प्रमाणावर न्यायालयीन प्रक्रियेविना ही रक्कम सायबर सेलच्या कक्षाने मिळवून दिली आहे.
ऑनलाईन फसवणूक झालेल्यांमध्ये सर्वात कमी पाचशे रुपयांची रक्कम होती. तीही सायबर सेल कक्षाने गंभीरपणे तपास करून परत मिळवून देण्याचे काम केले आहे. ऑनलाईन फसवणुकीत सर्वात अधिकची ३६ लाख रुपयांची फसवणूक क्रिप्टो गुंतवणुकीतील होती. ही सर्वच्या सर्व रक्कम परत मिळवून ती तक्रारदाराला देण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या २०२२ सालात ऑनलाईन फसवणुकीमधील ९१ लाख ९४ हजार रुपये सायबर सेल कक्षाने परत मिळवले आहेत.
ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी नेमक्या कोणत्या?
वीज बिल अपडेट. बँक केवायसी अपडेट. गुगल सर्चिंग. टेलिग्राम, इन्टाग्राम, फेसबुकवरील वर्क फ्रॉम होम जाहिराती. ओएलएक्स शॉपिंग, सेलिंग अँड अदर वेअज. लोन अप इन्स्टाल. फेसबुक मॅसेंजर. व्हाटसअप न्यूड व्हिडीओ कॉल. क्रिप्टो करन्सी इन्वेस्टमेंट. आदींचे मॅसेज आल्यानंतर आपण सर्चिंग केल्यानंतर ऑनलाईन फसवणूक होत असते.
फसवणुकीची तक्रार कुठे करायची?
ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क रहावे. फसवणूक झाल्यास तात्काळ www.cybercrime.gov.in अथवा १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार करावी. तात्काळ तक्रार नोंदवल्यास फसवणूक झालेली रक्कम थांबवण्यात व तक्रारदाराच्या मूळ खात्यात परत जमा करण्याची शक्यता अधिक असते.