घरपालघरमोखाड्यात विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

मोखाड्यात विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

Subscribe

त्याठिकाणी येईपर्यंत वाहनाचे लायनर गरम झालेले असतात. तिथून खाली आल्यानंतर थेट उतार आणि जाग्यावर वळण असल्याने याठिकाणी एक दिवसा आड अपघात झाल्याचे दिसून येते. अशातच हा मोठा अपघात झाला आहे.

मोखाडा : राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अपघात होत असतात.त्यातील काही अपघात हे विचित्र असतात.तसेच अशा अपघातांमध्ये दुर्दैव साथ सोडत नाही.असाच एक दुर्दैवी अपघात मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मोखाडा हद्दीतील तोरंगण घाटातील उतारावरील एक तीव्र वळणावर घडला. काल (रविवारी) रात्री एक आयशर ट्रक दरीत कोसळल्यानंतर तो ट्रक काढण्यासाठी ट्रक मालक हे आपल्या स्वीफ्ट कारमधून याठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी या वळणाच्या जागेवर आपली कार लावली होती. यावेळी अचानक वरून थेट दुसरा आयशर ट्रकने कारला टक्कर दिल्याने कारसह थेट दरीत कोसळला. यामुळे अगोदरच त्या दरीत कोसळलेल्या ट्रकवर ही दोन्ही वाहने जावून आदळली. यामध्ये आयशर ट्रकचा चालक मुसा खान (३२) याचा मृत्यू झाला आहे. मृत खान याचा मृतदेह ट्रक खाली फसल्याने अद्यापपर्यंत काढण्यात यश आले नसले तरी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. तोंरगण घाटातील हे ठिकाण अतिशय धोकादायक असून नाशिकवरून येताना त्र्यंबकेश्वरच्या नंतर मोठा घाट सुरु होतो. यावेळी मोखाडा हद्द सुरू होताच एक तीव्र उतार आहे. त्याठिकाणी येईपर्यंत वाहनाचे लायनर गरम झालेले असतात. तिथून खाली आल्यानंतर थेट उतार आणि जाग्यावर वळण असल्याने याठिकाणी एक दिवसा आड अपघात झाल्याचे दिसून येते. अशातच हा मोठा अपघात झाला आहे.

धोक्याची सूचना देणारा फलक नाही

- Advertisement -

मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मोखाडा हद्दीतील तोरंगण घाटातील उतारावरील एक तीव्र वळण हे अपघाती वळण बनले असून याठिकाणी एक दिवसाआड अपघात होत असल्याचे चित्र आहे. एवढे मोठे अपघाती वळण असतानाही याठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलक नाही. वाहनांचे ब्रेक फेल झाले तर वाहन अडवण्यासाठी काहीच उपाययोजना नाही. या भागात वाहनांना विश्रांतीसाठी जागा नाही. यामुळे खरेतर याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत मोठी उपाय योजना करून लोकांचे जीव वाचवणे गरजेचे आहे. मात्र कित्येक वर्षानुवर्षे शेकडो अपघात आणि शेकडो जीव जावूनही याबाबत उपाय योजना होत नसेल तर मग उपाययोजना न करणार्‍या विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आता सर्वसामान्य करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -