Eco friendly bappa Competition
घर पालघर कट का मारली म्हणून राडा केला, भांडणात एकाचा जीव हकनाक गेला

कट का मारली म्हणून राडा केला, भांडणात एकाचा जीव हकनाक गेला

Subscribe

मोर्वेपर्यंत हा पाठलाग सुरू होता. त्यानंतर दुचाकी चालकांनी कारच्या काचा फोडल्या. संतापलेल्या चारचाकी वाहन चालकाने दुचाकी चालकांच्या अंगावर गाडी घातली. त्यात दुचाकी चालकांना गंभीर दुखापत झाली होती.

भाईंदर :-कधी कधी काही क्षणांसाठी अनोळखी व्यक्तीशी घातलेली हुज्जत जीवावर बेतू शकते.याचाच प्रत्यय मीरारोड परिसरात आला आहे.तरंग सिंह असे या वादात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मीरारोड परिसरात २९ जुलै रोजी सायंकाळी हटकेश येथे दुचाकीला कट का मारली म्हणून मुकेश सोनी आणि तरंग सिंह यांचा दवणे अंथोनी गिलरॉ या कारचालकाशी वाद झाला.कारचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्या दुचाकी चालकांनी पुन्हा उत्तनच्या दिशेने चारचाकी गाडीचा पाठलाग केला.मोर्वेपर्यंत हा पाठलाग सुरू होता. त्यानंतर दुचाकी चालकांनी कारच्या काचा फोडल्या. संतापलेल्या चारचाकी वाहन चालकाने दुचाकी चालकांच्या अंगावर गाडी घातली. त्यात दुचाकी चालकांना गंभीर दुखापत झाली होती.

कारचालकाने पाठीमागून वेगाने येवून त्यांच्या मोटार सायकलला जोरात धडक दिली. त्यामुळे ते दोघेही खाली पडले आणि त्यांच्या पोटावर, पाटीवर जखमा झाल्या आणि उजव्या पायाला आणि तोंडाला मार लागला हनुवटीला जखम होऊन रक्त निघाले होते.त्या तसेच मयत झालेले तरंग सिंह याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर तरंग सिंह याचा बुधवारी जे.जे. रुग्णालयात उपचार असताना मृत्यू झाला. याप्रकरणी दवणे अंथोनी गिलरॉ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश सिंह याचा पाय तुटला असून त्यात तरंग सिंह यांचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी खुनाच्या कलमात वाढ केली असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -