Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर पालघर एका भागीदाराला केली अटक, गणेश ज्वेलर्स फसवणूक प्रकरण

एका भागीदाराला केली अटक, गणेश ज्वेलर्स फसवणूक प्रकरण

Subscribe

सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश ज्वेलर्स या सोना चांदीचे दागिने विक्री करणार्‍या मालकांनी 36 ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात हितेश ढोलकिया या भागिदाराला अटक करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

सफाळे पूर्व भागातील रेल्वे फाटक समोरील गणेश ज्वेलर्स या दुकानात दोन भागिदारी मिळून दुकान चालवित होते. पंधरा दिवसांपासून अचानक दुकान बंद करून त्यांनी सोने व लाखोंच्या वर रोख रक्कमसह ग्राहकांची फसवणूक करून फरार झाले होते. दरम्यान, परिसरातील आतापर्यंत 50 ग्राहकांनी सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत ग्राहकांनी गणेश ज्वेलर्सचे मालक कान्हाराम दलाराम चौधरी व हितेश ढोलकिया या दोन भागीदारांवर सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदरच्या प्रकरणात पोलिसांनी हितेश ढोलकिया या साथीदाराला अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश बेलकर मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -