घरपालघररिअॅक्टरच्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू,तीन कामगार जखमी

रिअॅक्टरच्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू,तीन कामगार जखमी

Subscribe

मुकेश भिल्लासिंग झाबुआ( वय 26)असे मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव असून अजय भुमिया (वय 26)अर्जुन डामोर( 20)व राकेश डामोर (26 ) हे तीन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खुपरी येथील कल्याणी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाडा: तालुक्यातील कोनसई या गावाच्या हद्दीत असलेल्या सुपीम एनर्जी टायर या कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट होऊन एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून तीन कामगार जखमी झाले आहेत.ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुकेश भिल्लासिंग झाबुआ( वय 26)असे मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव असून अजय भुमिया (वय 26)अर्जुन डामोर( 20)व राकेश डामोर (26 ) हे तीन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खुपरी येथील कल्याणी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोनसई या गावाच्या हद्दीत’ सुपीम एनर्जी टायर ‘ ही कंपनी असून या कंपनीत गाड्यांच्या जुन्या टायरमधून फर्नांस आॅईलचे उत्पादन घेतले जाते.बुधवारी रात्रीच्या सुमारास कंपनीत काम सुरू असताना रिअॅक्टरचा स्फोट होऊन रिअॅक्टरमधील गॅस जोरात बाहेर आल्याने मशिनमधील झाकणाचा जोराचा फटका मुकेश याच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर संजय, अर्जुन व राकेश हे तीन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खुपरी येथील कल्याणी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला असून कामगारांना तत्काळ आर्थिक मदत करून व्यवस्थापक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भुमिपुत्र कामगार सेनेचे अध्यक्ष सुरेश भोईर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -