घरपालघरजिल्हा माहिती कार्यालय समस्यांच्या विळख्यात; कार्यालयात केवळ तीनच कर्मचारी

जिल्हा माहिती कार्यालय समस्यांच्या विळख्यात; कार्यालयात केवळ तीनच कर्मचारी

Subscribe

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने कार्यरत असलेले पालघर जिल्हा माहिती कार्यालय सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने कार्यरत असलेले पालघर जिल्हा माहिती कार्यालय सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. ना अधिकारीवर्ग, ना अन्य कर्मचारी. अनेक पदे रिक्त असून अवघे दोन ते तीन कर्मचारीच सर्व जिल्ह्याचा कारभार हाकत आहेत. अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने कार्यालयीन कामकाजात मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे. गेले काही महिने जिल्हा माहिती अधिकारी नसलेल्या कार्यालयात अन्य पदांची भरतीच झाली नसून कायमस्वरूपी एकमेव कर्मचारी संपूर्ण कार्यालयाचा कारभार हाकत असल्याचे दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती गेल्या सहा वर्षांपूर्वी झाला असून ४० टक्के पदे सध्या रिक्त आहेत. पालघर जिल्ह्याला थेट मंत्रालयातूनच अशा प्रकारची सापत्नभवाची वागणूक मिळत असून अनेक कार्यालये आजही ठाणे येथे आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्याला मंजूर कार्यालये आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने विकासकामात तर मोठ्या प्रमाणावर अडसर निर्माण झाला आहे.

- Advertisement -

माहिती कार्यालयात विविध पदांची वानवा आहे. आम्ही आमच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोचवल्या आहेत. काही दिवसांतच उर्वरित पदे भरण्यात येणार आहेत. पाठपुरावा सुरू आहे.
– डॉ. गणेश मुळे, उपसंचालक, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, कोकण भवन, बेलापूर

पालघर जिल्हा माहिती कार्यालयाला देण्यात आलेली चारचाकी गाडी सध्या धूळखात पडून आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या चालकाचीही नियुक्ती नसल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अगदी नवी कोरी गाडी त्यावेळी ठाणे येथून देण्यात आली होती असे समजते. फक्त तीन कर्मचाऱ्यांवर पालघर जिल्ह्याचे जनसंपर्क आणि माहिती प्रसारण करणाऱ्या कार्यालयाची अशी अवस्था असेल तर जिल्ह्याचा कारभार कशाप्रकारे हाकला जात असेल याचा विचार वरिष्ठ पातळीवर होणे गरजेचे आहे. आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असूनही कुणीच शासनविरोधात आवाज उठवताना दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांची जिल्हा विभाजनाची मागणी मान्य केली खरी पण आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याने विकास कामेही ठप्प झाली आहेत.

- Advertisement -

पालघर जिल्ह्याचे माहिती अधिकारी राहुल भालेकर यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचाही कार्यभार असल्याने त्यांना ठाणे येथून पालघरचा कार्यभार हाकावा लागत आहे. त्यामुळे भालेकर यांचीही कसरत होते. सध्या जिल्हा परिषदेकडे पूर्णवेळ जनसंपर्क अधिकारी असल्याने त्याचा उपयोग जिल्हाधिकारी कार्यालय सर्रास करताना दिसत आहे. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांतच विस्कटलेली कार्यालये एकत्र येणार आहेत. भविष्याचा विचार करता भल्या मोठ्या इमारतींमध्ये ही कार्यालये स्थानापन्न होणार आहेत. मात्र, या कार्यालयात फोन आणि तीन कर्मचारीच कार्यरत असतील तर एवढ्या मोठ्या वास्तूचा उपयोग तर काय, असा प्रश्न पालघरवासिय विचारत आहेत.

हेही वाचा –

पवारांचा हुबेहूब आवाजाला वापरले एप, अखेर पोलिसांना सापडलाच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -