घरपालघरवाढवण बंदर विरोधक मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार

वाढवण बंदर विरोधक मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखणार

Subscribe

तत्पूर्वी सर्व नियम,कायदे,अटी, शर्ती,धाब्यावर बसवून सागरी किनारा व्यवस्थापन मंडळानेही,वाढवण बंदराला परवानगी देऊन हिरवा कंदील दाखविला होता,असा आरोप होत आहे.

डहाणू: आज 22 फेब्रुवारी 2024 रोजी चारोटी येथे मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून बंद करणार असल्याची घोषणा वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती मच्छीमार संघटना,आदिवासी संघटना आणि इतर सहयोगी संघटनांनी केली आहे. 19 जानेवारी 2024 रोजी वाढवण बंदराबाबत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेली जन सुनावणी झाली असली तरी,त्यात 35 हजार लोकांनी हरकती घेतल्या आहेत. तरी देखील,केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्रालयाने,बंदराला पर्यावरणीय मंजुरी देखील दिली. तत्पूर्वी सर्व नियम,कायदे,अटी, शर्ती,धाब्यावर बसवून सागरी किनारा व्यवस्थापन मंडळानेही,वाढवण बंदराला परवानगी देऊन हिरवा कंदील दाखविला होता,असा आरोप होत आहे.

त्यामुळे येथील भूमिपुत्रांमध्ये सरकार विरोधात असंतोष खतखदत आहे.त्याचा उद्रेक हा २२ फेब्रुवारी 2024 ला होणार्‍या मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून होणार आहे. यासाठी आंदोलनाला कुठलेही गालबोट लागू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने कासा येथील आचार्य भिसे विद्यालयाच्या मैदानावर संध्याकाळी तयारी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -