घरपालघरनव्या जिल्हाध्यक्षाला विरोध; भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

नव्या जिल्हाध्यक्षाला विरोध; भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Subscribe

मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली आहे. व्यास यांच्या निवडीला माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली आहे. व्यास यांच्या निवडीला माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी जोरदार आक्षेप घेतला असून जिल्हाध्यक्ष बदलला नाही तर पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान होईल, असा इशारा पक्षाला देत बंडाचा झेंडा उगारला आहे. मावळते जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे प्रकृत्ती अस्वस्थामुळे दूर झाले आहेत. म्हात्रेंना माजी आमदार नरेंद्र मेहता यांनीच जिल्हाध्यक्षपदी बसवले होते. पण, गेल्या काही महिन्यांपासून म्हात्रेंनी मेहता विरोधात आघाडी उघडली होती. त्यामुळेही मेहता अस्वस्थ झाले होते. म्हात्रे यांची प्रकृत्ती अस्वस्थामुळे नव्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला होता. त्यामुळे मेहतांनी नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेमणुकीसाठी फिल्डींग लावली होती. पण, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेहताविरोधी नगरसेवकांच्या गटातील म्होरके रवी व्यास यांची नियुक्ती करून मेहतांना धक्का दिला आहे.

मेहतांना विरोध करण्यात रवी व्यासही आघाडीवर होते. मेहता यांची महापालिका आणि पक्षातील हस्तक्षेप थांबवण्यासाठी सुरु असलेल्या आघाडीत व्यास पुढे होते. त्याच व्यास यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडल्याने मेहता पुन्हा एकदा अस्वस्थ झाले आहेत. सध्या ते उघडपणे विरोधात येत नसले तरी त्यांच्या समर्थकांना पुढे करून त्यांनी व्यास यांच्या निवडीला, पर्यायाने पक्षालाच आव्हान दिले आहे. विद्यमान महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर यांच्यासह उपमहापौर, स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, सभागृह नेते यांच्यासह ५२ नगरसेवक आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यास यांच्या निवडीविरोधात सह्यांचे निवेदन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisement -

मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपचे ६१ नगरसेवक, ३ स्विकृत नगरसेवक, व इतर पक्षांचे पाच नगरसेवक पक्षासोबत आहेत. जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांचे संघटनात्मक काम समाधानकारक नसल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक वारंवार पक्षाकडे तक्रार करीत होते. त्यामुळे पक्षाने नवीन जिल्हाध्यक्षाची नियुक्ती सर्वसंमतीने केली जाईल, असे आश्वासन दिले होते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, रवी व्यास यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीबाबत पक्षाने नगरसेवक व पदाधिका-यांशी चर्चा केली नाही. या नियुक्तीमुळे शहरातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सुमारे ५२ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी व्यास यांच्या निवडीला विरोध केला असून त्यांच्यात असंतोष पसरला असून पक्षात फूट पडून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही मेहता समर्थकांनी दिला आहे.

- Advertisement -

जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये त्वरीत बदल करण्यात यावा. अन्यथा पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान होईल, असा इशारा देत मेहता समर्थकांनी थेट प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिले आहे. मेहता समर्थकांच्या बंडापुढे पक्ष कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –

ठाण्यात कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -