घरपालघरअन्यथा १५ जूनपासून राज्यभर आंदोलन करू; मच्छिमारांचा इशारा

अन्यथा १५ जूनपासून राज्यभर आंदोलन करू; मच्छिमारांचा इशारा

Subscribe

राज्यात झालेल्या चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची राज्य मंत्रीमंडळाने तुटपुंज्य आर्थिक मदत जाहिर करून मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे.

राज्यात झालेल्या चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची राज्य मंत्रीमंडळाने तुटपुंज्य आर्थिक मदत जाहिर करून मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी राज्य सरकारने किमान अडीचशे कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहिर करावी, अन्यथा १५ जूनपासून राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.

तौक्ते चक्रीवादळात ७ मच्छिमार मृत्यू, बेपत्ता झाले आहेत. १५६ मासेमारी नौका पूर्ण जाळ्या व मासेमारी साधन सामुग्रीसह नष्ट झाल्या आहेत. तर १०२७ नौकांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे, असे असताना ज्या मच्छिमारांच्या ५ ते ४० लाख रुपयांच्या मासेमारी नौका पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. त्यांना फक्त रूपये २५ हजार रुपये व दुरूस्तीकरता रूपये १० हजार रुपये आणि जाळ्या पूर्ण नष्ट-दुरूस्ती करता रूपये ५ हजार रुपयांची मदत जाहीर करून राज्य सरकारने मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळून कोळी समाजाचा घोर अपमान केला आहे. त्याचबरोबर वादळी पावसामुळे खळ्यांवर साठवून ठेवलेली सुकी मासळी, सुकवण्यास घातलेली मासळी वाहवून गेली. तसेच मासळी विक्रेता महिलांनी ताजी मासळी घेतलेली वाया गेली याचा उल्लेख देखील केलेला नाही. यांचे पंचनामे देखील केले नाहीत. तौक्ते चक्रीवादळात राज्यातील मच्छिमारांचे तब्बल पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा समितीने केला आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती व राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे बाबा आदम खानच्या जमान्यातील कायदे लागू करून तौक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना तुटपुंज्य अर्थिक मदत राज्य व केंद्र सरकार ने देऊ नये. मागे फयान वादळग्रस्त मच्छिमारांना अर्थमंत्री जयंत पाटील असताना शंभर कोटींची मदत देण्यात आली होती. तसेच मासेमारी नौका पूर्ण निकामी झाल्या होत्या. त्या नौका, जाळ्यांचे पुनर्वसन केले होते. तसेच मासे विक्रेत्या, मासे सुकवणार यांना अर्थिक मदत केली होती. तशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या वतीने रूपये २५० कोटीची अर्थिक मदत करावी. तेवढीच मदत केंद्र सरकारकडून मिळण्यास सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु मच्छिमारांच्या पदरी निराशाच आल्याचा आरोप समितीने केला आहे.

१९९८ मधील वादळात मुंबईत मढ कोळीवाड्यात ३ व वेसावा कोळीवाड्यात २ नौका पूर्ण नष्ट झाल्या होत्या. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व मत्यव्यवसाय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ लक्ष घालण्याचे आदेश दिले. मनोहर जोशी वेसावामध्ये व नारायण राणे मढ येथे येऊन मुख्यमंत्री निधीतून ६० हजार रुपयाची तात्काळ मदत दिली होती. तसेच पुनर्वसन देखील केले. यावेळी मुंबईत ५० च्यावर मासेमारी नौका नष्ट झाल्या. परंतु शिवसेनेचा एकही नेता अथवा मंत्री फिरकला नसल्याची खंत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

गुजरात राज्याप्रमाणे केंद्र सरकारने अर्थिक मदत करावी. राज्य व केंद्र सरकारने येत्या आठवडाभरात भूमिका स्पष्ट करावी. अथवा १५ जून २०२१ पासून राज्यभर महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आंदोलन करील, असा इशारा समितीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, पुर्णिमा मेहेर या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मदतीची मागणी –

१) बिगर यांत्रिक, एक दोन व तीन सिलेंडर नौकांना ३,००,००० रूपये
२) चार सिलेंडर नौकांना ५,००,००० रूपये
३) सहा सिलेंडर नौकांना १०,००,००० रूपये
४) मृत्यू/बेपत्ता मच्छिमारांच्या नातेवाईकांना १०.०० लाख रूपये
५) मासळी सुकविणारे, मासळी विक्रेता महिलांना १०,००० रूपये

हेही वाचा –

बियाणे, खतांच्या विक्रीत काळाबाजार; खासदार, आमदार आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -