पालघर: पालघरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेवर तिच्याच मित्राने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही. बलात्काराची घटना मोबाईमध्ये कैद केली. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी सोमवारी कलम 376(2) (एन) आणि भारतीय दंड संहिंता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार महिलेच्या मित्रासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (Palghar Crime Married Women assuaulted by friend in palghar video goes viral on Social media )
नेमंक काय घडलं?
बोईसर जवळील खैरापाडा येथे आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या 34 वर्षीय विवाहित महिलेचे एका तरुणासोबत पाच वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. यादरम्यान महिलेसोबतच्या शारीरिक संबंधाच्या अश्लील चित्रफिती पतीला दाखवण्याची धमकी देण्यात येत होती. यानंतर पीडित महिलनेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार महिलेने बोईसर पोलीस ठाण्यात नोंदवली.
महिलेवर शारीरिक अत्याचार आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी जिजाऊ सामाजिक संघटनेचा बोईसर विधानसभा अध्यक्ष नरेश धोडी, सागर धोडी आणि संतोष यादव या तिघांवर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी तीनही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
जिजाऊ संघटना ही महिला सक्षमीकरणासाठी काम करते. बोईसर येथील महिला बलात्कार प्रकरणाशी नरेश धोडी याचा काडीमात्र संबंध नसताना राजकीय नेत्यांनी षड्यंत्र रचून त्याच्यावर गुन्हा करण्यात आल्याचं म्हटंल जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील होत आहे.
( हेही वाचा : चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाने केली आईची हत्या, वसईतील घटनेने खबळबळ )