घरपालघरपालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील तेल तवंगाचा जैवविविधतेला धोका

पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील तेल तवंगाचा जैवविविधतेला धोका

Subscribe

पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील केळवे, माहिम, शिरगाव किनाऱ्यालगत दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुमारास तेलाचा तवंग येतो. हा तवंग किनाऱ्यावर साठून डांबरसदृश्य द्रव तयार होत असतो.

पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील केळवे, माहिम, शिरगाव किनाऱ्यालगत दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुमारास तेलाचा तवंग येतो. हा तवंग किनाऱ्यावर साठून डांबरसदृश्य द्रव तयार होत असतो. हे तेलाचे तवंग कुठून कसे व का येतात याविषयी ठोस माहिती अजून प्राप्त झालेली नाही. पण, तेल गोळ्यामुळे किनाऱ्यानजीकच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून पालघर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डांबरसदृश्य द्रव्य पदार्थ येत आहेत. अशा प्रकारच्या द्रव्य पदार्थांमुळे किनाऱ्यावर लोकांना चालणेही कठीण होऊन बसते. बऱ्याचवेळा या डांबराला आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानीसुद्धा झाली आहे. यामुळे पर्यावरण व मत्स्य जीवांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते तेल तवंग यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास भविष्यात कांदळवणसह मत्स्य प्रजातीसुद्धा नष्ट होऊन जातील. तेल तवंग यांचा प्रामुख्याने मोठा परिणाम पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मासेमारीवर होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने केळवे, एडवण, दातिवरे, कोरे, मथाने,माहीम, वडराई समुद्रकिनारी फार मोठ्या प्रमाणात डांबर जमा झाले आहे. समुद्रकिनारी डांबराचे थर निर्माण झाले आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी व मच्छीमार बांधव साशंक झाले असून याबाबतीत एकमेकांकडून अधिक माहिती करून घेत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी एडवण, केळवे समुद्रकिनारी अशाच डांबराला मोठ्या प्रमाणात आग लागून शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या मानवी वसाहतीला या आगीचा धोका निर्माण झाला होता. स्थानिक लोकांनी प्रयत्नांची पराकष्ट करून ही आग वेळीच नियंत्रणात आणली होती. अन्यथा खुप मोठा अनर्थ घडू शकला असता.
ओएनजीसीच्या तेल विहीरीतून हे टाकाऊ तेल गोळे समुद्रात फ्लस केले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली. सरकार, पर्यावरण आणि सीआरझेड नियमाबाबत अतिशय सजग आहेत. ज्या प्रकल्पामुळे अशाप्रकारचे प्रदूषण होत आहे. त्यांवर नियमांप्रमाणे निर्बंध आणू शकत नाही का?, असा सवाल येथील जनता करत आहे.

- Advertisement -

समुद्रकिनारी साचलेल्या डांबराच्या थरांबद्दल आपणास सविस्तर माहिती देता येणार नाही. मात्र ओएनजीसीमुळेच हे डांबराचे थर निर्माण झाले आहेत. डांबर सदृष्य द्रव्य पदार्थामुळे खुप मोठे नुकसान होत आहे.
– करुणा तरे, सरपंच, एडवण ग्रामपंचायत

ओएनजीसी व तत्सम कंपन्या समुद्रात निरंतर तेल उत्खननासाठी ड्रिलिंग करत असतात. मात्र ड्रिलिंगद्वारे खणलेल्या प्रत्येक तेल विहिरीतून व्यापारीदृष्टीने परवडेल असे कच्चे तेल (क्रूड ऑईल) निघतेच असे नाही. अशावेळी हे ड्रिलिंग केलेली विहीर (होल) या कंपन्या तसेच मोकळे सोडतात. कारण छिद्र बंद करण्यासाठीचा वेळ व खर्चाची त्यांची तयारी नसते. अशा उघड्या सोडलेल्या अर्धवट खणलेल्या खाणीतून सतत काही प्रमाणात क्रूड ऑईल बाहेर पडत असते. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र खवळतो व वादळामुळे हे क्रुड ऑईल डांबर स्वरूपात किनाऱ्यावर येत असते. सागरी पर्यावरणाची व मत्स्य परिसंस्थेची अपरिमित हानी करणारा हा प्रकार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट, अनेकजण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -