घरपालघररोजगार हमी योजनेत पालघर जिल्ह्याची पुन्हा बाजी

रोजगार हमी योजनेत पालघर जिल्ह्याची पुन्हा बाजी

Subscribe

रोजगार हमी योजनेत रोजगार उपलब्ध करून देण्यात पालघर जिल्हा राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामावर एक लाखाहून अधिक मजूर काम करत आहेत.

रोजगार हमी योजनेत रोजगार उपलब्ध करून देण्यात पालघर जिल्हा राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामावर एक लाखाहून अधिक मजूर काम करत आहेत. राज्यात रोजगार हमीच्या कामावर सर्वाधिक मजूर पालघर जिल्ह्यात आहेत.

पालघर जिल्हा स्थापनेवेळी रोजगार हमी योजनेच्या कामावर येण्यासाठी मजूर उदासीन होते. मजुरी कमी असल्यामुळे मजूर कामावर येत नव्हते. मात्र, अलीकडील काळात मजुरी वाढली. तसेच स्थानिक स्तरावर काम उपलब्ध होत आहे. याशिवाय रोजगार हमी योजनांच्या कामांवर मध्यान्ह भोजन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कामांवर येणार्‍या मजुरांची संख्या मोठी वाढली. परिणामी पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत कामेही प्रभावी होऊ लागली.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर काम केलेल्या अकुशल मजुरांची मजुरी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आता अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा झाली आहे. मजुरी मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणखी काही रक्कम प्रलंबित असली तरी लवकरच ती मजुरांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे रोजगार हमी योजना विभागाने म्हटले आहे.

जिल्हा प्रशासन रोजगार हमी योजनेवर विशेष भर देत आहे. ग्रामीण भागांमध्ये रोजगार हमी विषयी जनजागृती येऊन तेथील नागरिक व मजूर या कामांवर येत आहेत. स्थानिक स्तरावर काम उपलब्ध होत असल्यामुळे कुपोषण, स्थलांतर अशा समस्यांना काही प्रमाणात आळा बसेल, असे प्रशासनाने म्हटले आहे. मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथे योजना प्रभावी राबवण्यासाठी विशेष भर दिला जात आहे. मजुरांना दुपारचे जेवण देण्यासाठी येथे सामुदायिक व केंद्रीय स्वयंपाक घर तयार केले जाणारअसल्याची माहिती योजनेचे उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे.

- Advertisement -

मनुष्यदिन निर्मितीत द्वितीय

ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यात 2021-22 या आर्थिक वर्षात 23.69 लाख मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट होते. तर 31 मार्च 2022 अखेरपर्यंत 66.80 लाख (282 टक्के) इतके उद्दिष्ट साध्य झाले आहे. या वर्षात 158 कोटी 69 लाख 73 हजार इतकी मजुरी मजुरांना प्रदान करण्यात आली. मजुरी खात्यावर आठ दिवसाच्या आत प्रदान करण्याचे जिल्ह्याचे प्रमाण 88.74 टक्के आहे. मंगळवारपर्यंत पालघर जिल्ह्यात एक हजार 136 कामांवर ९० हजार 267 इतके मजूर उपस्थित होते. सर्वाधिक मजूर उपस्थितीत पालघर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यात एकूण 2,35,737 जॉब कार्डधारक आहेत. आतापर्यंत 83,768 कुटुंबातील 1,86,658 मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मनुष्यदिन निर्मितीमध्ये 282 टक्के उद्दिष्ट साध्य केल्याने राज्यात मनुष्यदिन निर्मिती करण्यात पालघर जिल्हा द्वितीय क्रमांकावर आहे.

रोजगार हमी योजनेवर मध्यान्ह भोजनाचा समावेश केला आहे. योजनेद्वारे चांगले काम व मजुरी प्राप्त होत असल्यामुळे स्थलांतराचा विषय सुटण्यास मदत होईल. तसेच कुपोषण निर्मूलनासाठीही याचा मोठा फायदा होणार आहे.
– सुरेंद्र नवले, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -