वसई: पालघर आणि ठाणे जिल्हे हे शेती व्यवसाय करणारे जिल्हे आहेत. मुख्यत्वे भात शेती करणारे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आहेत . परतीच्या पावसामुळे भात शेतीचे ठाणे ,पालघर जिल्ह्यात अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, शासनाने पंचनामे करून सुद्धा तसेच ग्रामपंचायत ,तहसील यांच्यामार्फत पंचनामे होऊन सुद्धा पालघर आणि जिल्ह्यातील शेतकर्यांना पिक विमा अजून मिळालेला नाही.शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे कापणीला आलेले पीक आणि कापलेले पिक शेतातच पडून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आपला शेतीवरच असलेला प्रपंच चालवणे शेतकर्यांना आता कठीण झालेले आहे. त्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करून जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचा त्यांना पिक विमा लवकरात लवकर शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा,अशी मागणी पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था ,भारत या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विजय जी. चोघळा यांनी केली आहे.
Edited By Roshan Chinchwalkar