घर पालघर पालघर पोलिसांनी प्रगती केली

पालघर पोलिसांनी प्रगती केली

Subscribe

ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात पालघर पोलिसांच्या जनसंवाद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ प्राप्त मानांकन सर्टिफिकेट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

नदीम शेख,पालघर: पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पालघर पोलिसांनी चांगली प्रगती केली आहे, तसेच तीन वर्षांपूर्वीच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आणि आताच्या पोलीस ठाण्यात खूप बदल झाले असून पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या आयएसओ प्राप्त मानांकन सर्टिफिकेट मिळाले आहे. ही पालघर पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी पालघर येथे व्यक्त केले. ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात पालघर पोलिसांच्या जनसंवाद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ प्राप्त मानांकन सर्टिफिकेट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

पालघर येथे पालघर पोलिसांच्या जनसंवाद अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, गडचिंचलेत जेव्हा साधू हत्याकांड झाले, तेव्हा मी पुणे सीआयडीमध्ये होतो. तेव्हा ही केस माझ्याकडे आली होती. त्यावेळी या गुन्ह्यातील जवळपास शंभर आरोपींना कोविडमुळे ठाण्याला किंवा तळोजा कारागृहात नेणे शक्य नव्हते. तेव्हा कोर्टाने आदेश दिले की त्यांना पोलीस ठाण्यातच ठेवा, परंतु त्यावेळेस जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची परिस्थिती त्यांना ठेवण्या योग्य नव्हती. पण आता तीन वर्षांत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ आणि स्मार्ट पोलीस ठाण्याचे नामांकन प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ प्राप्त नामांकन सर्टिफिकेट मिळवून देणार्‍या उद्योजक समीर रूपलक व त्यांची पत्नी सेजल समीर रुपलक यांचे अभिनंदन केले. यादरम्यान पालघर जिल्ह्यातील पोलीस पाटलांना व पोलीस मित्रांना त्यांच्या हस्ते टीशर्ट, शिट्टी व टोपी वाटण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, पोलीस पाटील व पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -