घरपालघरपालघर जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

पालघर जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

Subscribe

तर विषय समिती सभापती पदासाठी संदेश ढोणे, रोहिणी शेलार, नीता पाटील, अरुण ठाकरे, संदीप पावडे अशा पाच सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.

पालघर : जिल्हा परिषद समिती सभापती आणि विषय समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी जिल्हा परिषद सभागृह येथे पार पडली असून चारही पदांसाठी बिनविरोध निवड झाली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत समाजकल्याण समिती सभापती पदासाठी मंगेश भोईर, मंदा घरट, राजेश मुकणे, मनीषा निमकर यांनी अर्ज दाखल केले होते. तसेच महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी नीता पाटील, विनया पाटील, भावना विचारे, रोहिणी शेलार यांनी अर्ज दाखल केले होते. तर विषय समिती सभापती पदासाठी संदेश ढोणे, रोहिणी शेलार, नीता पाटील, अरुण ठाकरे, संदीप पावडे अशा पाच सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.

मात्र, इतर सदस्यांनी अर्ज मागे घेतल्याने समाजकल्याण समिती सभापतीपदी बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी शेलार तर विषय समिती सभापती पदासाठी जिजाऊंच्या संदेश ढोणे आणि भाजपचे संदीप पावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी जाहीर केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे व सर्व सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संघरत्ना खिल्लारे, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -