Homeपालघरसरावली-मोरपाडा शाळेच्या नव्या जागेला पालकांचा विरोध

सरावली-मोरपाडा शाळेच्या नव्या जागेला पालकांचा विरोध

Subscribe

दानशूर व्यक्तीने दिलेली जागा असुरक्षित असून, एकांतात असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे सुरक्षित ठिकाणी ही शाळा बांधावी अशी पालकांची मागणी आहे.

डहाणू: तालुक्यातील सरावली-मोरपाडा शाळेची परिस्थिती लक्षात घेता या शाळेच्या नवीन इमारतकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात आला.त्यासाठी जागेची पाहणी करत एका ठिकाणी जागा ही निश्चित करण्यात आली. परंतु, इमारतीकरिता पाहण्यात आलेली जागा ही नदी किनारी असल्या कारणाने काही स्थानीय पालकांनी या जागेसाठी तीव्र विरोध केला आहे. यापूर्वी ही शाळा येथील रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पामध्ये गेल्याने तोडण्यात आली होती. ही शाळा गेल्या पाच वर्षांपासून दोन कंटेनरमध्ये भरत होती. लहान शालेय विद्यार्थ्यांचे खूप हाल होत होते. या प्रकाराची बातमी आपलं महानगरने दिली होती.त्यानंंतर शिक्षण प्रशासन, रेल्वे कॉरिडॉर प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर त्या शाळेच्या बांधकामाचा शुभारंभ18 डिसेंबर रोजी करण्यात आला होता. ही जागा नदीवर बांधलेल्या बंधार्‍या जवळ आहे. पावसाळयात येथे पुराचे पाणी येते. यामुळे बांधली गेलेली ईमारत खचण्याचा धोका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. दानशूर व्यक्तीने दिलेली जागा असुरक्षित असून, एकांतात असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे सुरक्षित ठिकाणी ही शाळा बांधावी अशी पालकांची मागणी आहे.

प्रतिक्रिया 1

मोरपाडा शाळेच्या सर्वच बाबतीत दुर्लक्ष केले जात आहे. पाच वर्षांपूर्वीचा प्रश्न अजून तसाच आहे. आता निधी मंजूर झाला असून दानशूर व्यक्तीने दिलेली जागा सुरक्षित ठिकाण नाही. तेथे नदी असून पावसाळ्यात मुलांना त्रास होणार आहे.भूस्खलन होऊन जमीन खचू शकते. इमारत तयार झाल्यास पालक आपल्या मुलांना या धोकादायक ठिकाणी शाळेत पाठवणार नाहीत.
– सिताराम गुजर (माजी मुख्यध्यापक, ग्रामस्थ सरावली.)

प्रतिक्रिया 2

सदर शाळेचे बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने भोवताली बॉल कंपाऊंड घातले जाईल. इमारतीला धोका पोहचणार नाही. या साठी काळजी घेतली जाईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची सावधानता बाळगली जाईल.

-माधवी तांडेल, प्रं. गट शिक्षण अधिकारी, डहाणू