घरपालघरमूळ रक्कम भरा, व्याज, दंडात ७५ टक्के सूट 

मूळ रक्कम भरा, व्याज, दंडात ७५ टक्के सूट 

Subscribe

मालमत्ता कर अभय योजना

मीरा भाईंदर शहरातील मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने अभय योजने अंतर्गत मालमत्ता कर भरणाऱ्या आस्थापनांसाठी करावरील व्याजावर ७५ टक्के माफी घ्यावी आणि कर आणि २५ टक्के दंड असे मिळून भरून कर भरण्यापासून सुटका मिळवावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

व्याज, दंडात ७५ टक्के सूट देण्यासाठी महापालिकेच्यावतीने २५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२१ या २० दिवसांच्या कालावधीमध्ये ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवली जात आहे. यामध्ये थकित मालमत्ता करधारकांनी आपल्या मालमत्ता कराची २५ टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांची ७५ टक्के दंडात्मक रक्कम माफ केली जाणार आहे.

- Advertisement -

मीरा भाईंदर परिसरात या योजनेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तांना प्राप्त अधिकारान्वये ही योजना लागू करण्यात आली आहे. ‘मालमत्ता कर अभय योजने’चा कालावधी २० दिवसांचा राहील. या योजनेंतर्गत 31 मार्च २०२० पर्यंत थकित कर असणाऱ्या, तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरता थकबाकीदार होणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्याने लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असल्याने थकित मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची मागणीदेखील करदात्यांनी केली होती. त्यानंतर पालिकेने ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

जे नागरिक व मालमत्ताधारक अभय योजना कालावधीत मालमत्ता कराचा भरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदार मालमत्ता करधारकांविरुद्ध महापालिकेमार्फत मालमत्ता जप्त करणे, मालमत्तेचा लिलाव करणे व इतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. मालमत्ता कराचा भरणा मोबाईल द्वारे करण्यासाठी महापालिकेने MY MBMC अॅपची निर्मिती करण्यात आली असून ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून द्याद्वारे कराचा भरणा करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -