घरपालघरयंदाच्या दिवाळीत ऑनलाईन खरेदीकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल

यंदाच्या दिवाळीत ऑनलाईन खरेदीकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल

Subscribe

व्यापारी ऑनलाईन पद्धतीच्या कंपन्यांनी आणलेल्या आव्हान आणि जव्हार तालुक्यातील दिवाळी खरेदीत स्थानिक पातळीवरील खरेदीला अल्प प्रतिसाद मिळाला. या आव्हानांनी छोटे खाणी व्यापारी वर्गांमध्ये मोठी अस्वस्थता झाली.

जव्हार: जव्हार तालुक्यात दरवर्षी दिवाळी सणामुळे मोठा उत्साह असतो.परंतु यंदा पावसाचा हंगाम लांबणीवर पडल्यामुळे नागरिकांनी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाणे टाळून ऑनलाईन खरेदीकडे अधिक भर दिला. परिणामी ग्रामीण भागातील बाजारपेठांवर दिवाळी सणासाठी छोटे खाणी व्यापारी वर्गाने आणलेली वस्तू विक्री होण्यात मोठ्या समस्या निर्माण झाल्याने तालुक्यातील बाजारपेठ मंदावली असल्याचे पाहायला मिळाले. प्रतिवर्षी सप्टेंबर अखेर संपणाऱ्या पावसाने हजेरी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लांबल्याने तसेच व्यापारी ऑनलाईन पद्धतीच्या कंपन्यांनी आणलेल्या आव्हान आणि जव्हार तालुक्यातील दिवाळी खरेदीत स्थानिक पातळीवरील खरेदीला अल्प प्रतिसाद मिळाला. या आव्हानांनी छोटे खाणी व्यापारी वर्गांमध्ये मोठी अस्वस्थता झाली.

खासगीरीत्या ऑनलाईन पद्धतीने घेणारा व्यवसाय प्रतिदिनी हजारोंच्या पटीत वाढत चालल्याचे दिसून आल्याने जव्हार मधील व्यापाऱ्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. काही व्यापारी पदाधिकाऱ्यांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये व्यवसायामध्ये असलेली स्पर्धा मान्य असली तरीही ऑनलाईन पद्धतीच्या व्यवसायामुळे अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीने व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय बंद करण्याचा विचार करीत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया

ऑनलाईन पद्धतीने होणारा व्यवसाय हा काही ठिकाणी सोयीस्कर सोपा व तुलनेने स्वस्त असला तरीही याचा थेट परिणाम लहान व्यापाऱ्यांना सहन करावे लागत आहेत. शहरातील बाजारपेठेवर मंदीचे सावट दिसून येत आहे.

- Advertisement -

-मकसुद अत्तार, व्यापारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -