Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर पालघर लग्नसोहळ्यासाठी पारंपरिक संबळ वाजंत्रीला लोकांची पसंती

लग्नसोहळ्यासाठी पारंपरिक संबळ वाजंत्रीला लोकांची पसंती

Subscribe

कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर आता सगळीकडे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर आता सगळीकडे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, दोन वर्षापूर्वी ताळेबंद लागल्याने जवळपास सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम झाला होता. यात लग्नसराईला सुद्धा कोरोनाचा फटका बसला होता. यामुळे मोजक्या लोकांमध्येच म्हणजे छोटेखानी लग्न समारंभ करण्याचे शासनाचे आदेश दिल्या गेल्याने ऐन लग्नसराईच्या हंगामात लॉन्स, मंगल कार्यालय संचालक, वाजंत्री, घोडेवाले, आचारी, वाढपी, मंडप डेकोरेटर्स आदी यासंबंधी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र सध्या होत असलेल्या छोटेखानी लग्न सोहळ्यासाठी कमी खर्चीक आणि पारंपरिक संबळ वाजंत्रीला लोकांची विशेष पसंती मिळत आहे. यामुळे संबळ वादकांना सध्या तरी अच्छे दिन आले आहेत, असे म्हणावे लागेल.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीप्रमाणे लग्न सोहळ्यासाठी दोन्ही बाजूंकडील जेमतेम ५० सगेसोयरे वर्हाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी होती. आता ती सक्ती नसली तरी कोरोनामुळे एक वेगळीच परंपरा रुढ झाली आहे. शिवाय शारीरिक अंतराचा नियम पाळून आणि उपस्थितांनी चेहर्यावर मास्क लावून अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळ्याचा प्रवास सध्या सुरू झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर लग्नात वरातीसाठी डीजेला पूर्णपणे परवानगी नसल्याने आता केवळ चार वादकांचे पथक असलेल्या पारंपरिक संबळ वाजंत्रीला सुगीचे दिवस आले आहेत.

- Advertisement -

संबळ वाजंत्रीचा आमचा पारंपरिक व्यवसाय असून गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून या लोककलेचा भाग आहे. काळाच्या ओघात लोप पावत चालली कला जीवंत ठेवण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत. संबळवादक, सूर व दोन सनई वादक असे चार वादकांचे पथक असून एका लग्नाची सुपारी सहा ते सात हजार रुपये असते. त्यामुळे बँड व डीजेच्या तुलनेत संबळ कमी खर्चीक वाजंत्री आहे. यामुळे लोकांची मागणी वाढत आहे. या कलेची जोपासना होण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या मुलांनादेखील ही वाद्ये शिकविण्याचा प्रयत्न करत आहोत.
– लक्ष्मण मोरे, सुर्यमाळ, संबळवादक

कोविडच्या परिस्थितीमध्ये या वाजंत्र्यांना व्यवसायावर पोटापाण्यासाठी अवलंबून असणार्या वादकांना नाइलाजाने अन्य व्यवसाय, शेती, मजुरी किंवा अगदी मिळेल ते काम करण्याची वेळ आली होती. आता मात्र लग्न सोहळ्यासाठी केवळ चार वादक असलेल्या संबळ वाजंत्रीला लोकांची मागणी वाढत आहे. काही वर्षापूर्वी लग्नसोहळा म्हटले की, सनई-चौघडे,संबळ वाजंत्री या पारंपारिक साधनांनाच विशेष पसंती मिळत असे.

- Advertisement -

लग्न म्हटले की, वाजंत्रीशिवाय शोभा नाही, असा काहीसा समज आहे. लग्नसराईच्या काळातील केलेली कमाई या वादकांना वर्षभर पुरतेच असे नाही. मात्र, पारंपरिक लोककला जिवंत रहावी म्हणून वाजंत्री मोजक्या रकमेवर सुपारी घेऊन आपली कला जोपासत असतात. गेल्या काही वर्षांपासून लग्नाचा थाट बदलला आहे. लग्नात वर्हाडी मंडळींची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. लग्नाच्या वरातीसाठी आलेल्या आधुनिक बॅण्ड, बेंजो, डीजेच्या दणदणाटात ही पारंपरिक वाद्य आणि वाजंत्री प्रकार काळाच्या ओघात लोप पावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा –

संजय राऊतांसाठी अनुशासनची ऐशी की तैशी करु, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

- Advertisment -