घरपालघरगुटख्याची वाहतूक करणार्‍या टेम्पोवर पोलिसांची कारवाई

गुटख्याची वाहतूक करणार्‍या टेम्पोवर पोलिसांची कारवाई

Subscribe

टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा करून तो बाजूला घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे टेम्पो रस्त्याच्या बाजूला थांबताच पोलीस पथकाने टेम्पो चालकास ताब्यात घेवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव त्रिभुवन मौर्या असे सांगितले.

भाईंदर :- काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतून टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक करून मुंबई येथे गुटखा घेऊन जात असताना काशीमीरा पोलीस ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून गुटखा व टेम्पो असा ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काशीमीरा पोलीस ठाणे दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना एक टेम्पो मुंबईच्या दिशेने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा हा तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक करून घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेली माहिती काशीमीरा पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक समीर शेख यांना मिळाली दिली. त्यानुसार याबाबत त्यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन कारवाई करण्यासाठी पथक रवाना केले.
दहशतवाद विरोधी पथकाने दिल्ली दरबार सिग्नल जवळ सापळा लावला. दिल्ली दरबार सिग्नल येथे एक टेम्पो येवून थांबल्यावर पोलीस पथकाने त्या टेम्पो चालकास थांबण्याचा इशारा करून तो बाजूला घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे टेम्पो रस्त्याच्या बाजूला थांबताच पोलीस पथकाने टेम्पो चालकास ताब्यात घेवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव त्रिभुवन मौर्या असे सांगितले.

कपड्यांच्या गोण्यांमध्ये गुटखा

- Advertisement -

टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये कपड्यांच्या गोण्या भरलेल्या दिसून आल्या. पोलीस पथकाने गोण्याची पाहणी केली असता, टेम्पोच्या आत भरलेल्या गोण्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याची पाकीटे असल्याचे दिसून आले. टेम्पोमधील सर्व गोण्या बाहेर काढून त्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटखा या तंबाखूजन्य पदार्थाची पाकीटे मिळून आली. त्यामध्ये विमल, रजनीगंधा व इतर गुटख्याची पाकिटे होती. त्याची किंमत २६ लाख ५३ हजार २०० रुपये व टेम्पोची किंमत साडे नऊ लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेम्पो चालक यांच्या विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -