घरपालघरसंकटमोचनासाठी पोलीस सज्ज

संकटमोचनासाठी पोलीस सज्ज

Subscribe

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व गणपतींचे विसर्जन केले जाते. शुक्रवारी गणपती विसर्जनासाठी शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी विसर्जन मार्गावर उभी असलेली वाहने हटवली जाणार आहेत.

भाईंदर – मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व गणपती विसर्जन मार्गांची पाहणी केली आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, वाहतूक कोंडी होणार नाही, तसेच शहरात वाद विवाद न होता कायदा सुव्यवस्थचे पालन करत गणपती विसर्जन व्हावे यासाठी पाहणी दौरा केला. त्यानुसार सर्व विसर्जन मार्ग व स्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवासाठी व विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मिरा- भाईंदर, वसई- विरार कार्यक्षेत्रात ३७५ पोलीस अधिकारी, १८०० पोलीस अंमलदार , ७५० होमगार्ड , ३५० महाराष्ट्र सुरक्षा बल अशा प्रकारे एकूण ३२७५ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व गणपतींचे विसर्जन केले जाते. शुक्रवारी गणपती विसर्जनासाठी शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी विसर्जन मार्गावर उभी असलेली वाहने हटवली जाणार आहेत.

अवजड वाहनांना प्रवेश बंदी

- Advertisement -

तसेच पोलीस उपायुक्त मुख्यालय विजयकांत सागर यांनी शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये व अपघात होऊ नये , विना अडथळा गणपती विसर्जन करता यावे , वाहतूक कोंडीमुळे वाद विवाद निर्माण होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) प्रमाणे व मोटर वाहन कायदा कलम ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्राप्त झालेले अधिकाराचा वापर करत शुक्रवारी सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यापासून ते रस्त्यावरील गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत अवजड वाहने मालवाहू वाहने व सर्व बसेस यांना प्रवेश बंदी केली आहे. सर्व मालवाहू वाहने, अवजड वाहने, बसेस यांना गोल्डन नेस्ट सर्कलपासून, विमल डेअरीकडे व रेल्वे स्टेशन पसिसरात तसेच भाईंदर पश्चिमेला भाईंदर पोलीस ठाणे ते भाईंदर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांनी, गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून गणपती विसर्जन शांततेत करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -