घरपालघरसफाळ्यात पोलिसांची नाकाबंदी; ४०० नागरिकांवर कारवाई

सफाळ्यात पोलिसांची नाकाबंदी; ४०० नागरिकांवर कारवाई

Subscribe

महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चेन अंतर्गत पारित केलेल्या नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी पालघर तालुक्यातील सफाळे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चेन अंतर्गत पारित केलेल्या नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी पालघर तालुक्यातील सफाळे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात नाकाबंदी करून सुमारे ४०० हून अधिक नागरिकांवर सफाळे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असून आतापर्यंत केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच यापुढेही नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यास पोलीस यंत्रणा चांगलीच अॅक्शन मोडमध्ये आली आहे.

महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन पंचक्रोशीतील नागरिकांनी करून करून प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
– संदीप कहाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक

- Advertisement -

राज्यभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट भयंकर वेगाने पसरू लागल्याने महाराष्ट्र सरकारने १ मे २०२१ पासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंधांची नियमावली जारी केली. त्यानुसार पालघर जिल्हाप्रशासनाकडून सर्वच पोलिस ठाण्यांना नियमांची अमलबजावणी करून कोरोनाचा प्रसार कमी करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने सफाळे पोलिसांनी केळवारोड, सफाळे बाजारपेठेतील देवभूमी हॉल समोर आणि पारगाव अशा तीन ठिकाणी २४ तास नाकाबंदी करण्यास सुरुवात केली. यावेळी संचारबंदीचे उल्लंघन करणे, विना मास्क फिरणे तसेच विनाकारण फिरणे, दुकाने उघडी ठेवणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या ४०० पेक्षा जास्त नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून ३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

विनाकारण गर्दी होऊ नये यासाठी सफाळे बाजारपेठेत किराणा माल, भाजीपाला किंवा इतर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींकडून गर्दी होऊ नये यासाठी घरातील एकाच व्यक्तीने खरेदीसाठी यावे, अन्यथा कडक कारवाई केली जाईल अशा सूचनाही पोलिसांकडून वारंवार केल्या जात आहेत. बाजारपेठेतील काही दुकानदार मोठ्या प्रमाणात अनावश्यक गर्दी करीत असल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर १ हजार रुपये आणि सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या ग्राहकांना ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

तराफा पी-३०५ दुर्घटना प्रकरण: कॅप्टन राकेश बल्लाव, मुख्य अभियंत्यासह अनेकांविरोधात गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -