Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर पालघर हायवेवरील अपघात रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

हायवेवरील अपघात रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

Subscribe

पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी हायवेवर होत असलेल्या अपघातांची गंभीरपणे दखल घेत अपघात रोखण्यासाठी आपल्या कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग देखरेख ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची एकत्रित बैठक बोलावली होती.

वसई : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अपघात रोखण्यासाठी पालघर पोलीस अधिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध खात्यांची बैठक बोलावून उपाययोजना करण्यासंबंधी ठोस योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी हायवेवर होत असलेल्या अपघातांची गंभीरपणे दखल घेत अपघात रोखण्यासाठी आपल्या कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग देखरेख ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची एकत्रित बैठक बोलावली होती. या बैठकीत हायवेवर असलेल्या अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्राबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालघर जिल्ह्यात एकूण १५ अपघात प्रवण क्षेत्र आहेत. याठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी सूचना फलक लावणे. अनधिकृत रोड कटींग बंद करणे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलर स्ट्रीप्स लावणे. रस्त्याच्या बाजूला वाहनधारकांना रस्त्यांचा अंदाज येण्यासाठी कॅट आईज, डेलिनेटर्स, ब्लिंकर्स लावणे. हायवेवर पडलेले खड्डे भरणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

या उपाययोजना तीन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. हायवेवर अपघात झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याकरता तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. म्हणूनच हायवेवर चार ठिकाणी रुग्णवाहिका करण्यात येणार आहेत. तसेच अपघातग्रस्त वाहने तात्काळ हायवेवरून बाजूला करण्यासाठी क्रेन आणि अग्निशमक पथक जिल्हा सुरक्षा समितीकडून एनआयएच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -