आरोपीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या पोलिसाची चौकशी सुरू

भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यात फ्लॅट देतो, अशी बतावणी करून १ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केलेल्या बिल्डरविरोधात २०१९ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यात फ्लॅट देतो, अशी बतावणी करून १ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केलेल्या बिल्डरविरोधात २०१९ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी मे महिन्यात अटक करण्यात आलेल्या बिल्डर बाबुराज पनिकर यांना तब्बल तीन वर्षांनंतर अटक केली आहे. तर मुख्य आरोपी महेंद्र कोठारी हा मात्र अजूनही फरार आहे. अटक केलेल्या आरोपीला यांना ठाणे न्यायालयाने जेल कोठडी सुनावली. मात्र असे असताना छातीत दुखत असल्याचे कारण सांगून हॉस्पिटल यात्रा घडविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांच्या आदेशाने मिरा पोलीस उपायुक्त अमित काळे हे चौकशी करत आहेत. मौजे गोडदेव सर्व्हे नं. ३६ (३२१) / ३ येथे चैतन्य हाईट्स, इंद्रलोक परिसरात तळ अधिक चार मजल्याची परवानगी दिलेली असताना विकासकांनी त्याठिकाणी ९ मजल्यापर्यंतची इमारत बांधली. तर फिर्यादी यांना ६ व्या वर एक आणि ८ व्या वर एक असे एकूण ६ फ्लॅट विकले.

त्याप्रकरणी विक्री करून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी २८ मार्च २०१९ साली  बांधकाम फसवणूक व मोफा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी तब्बल तीन वर्षांनंतर गोवा येथून बाबुराज पनिकर तर मिरारोड येथून सय्यद इंतखाब हसन यांना फसवणूक गुन्ह्यात २१ एप्रिल रोजी अटक केली होती. २५ एप्रिल रोजी न्यायालयाने आरोपींना जेल कोठडी सुनावली. तपास अधिकारी यांनी आरटीपीसीआर रिपोर्ट नसल्याचे सांगून तसेच त्यांच्या छातीत दुखत असल्याचे कारण देत आरोपींना भाईंदर पश्चिमेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (टेंबा) येथे व त्यानंतर जे. जे. रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांची तब्येत ठीक असल्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने दिला.
याप्रकरणी आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत नवघर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश केकान यांची पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा –

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणानेच निवडणुका होणार, SCचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात काय होणार?