घर पालघर दहिहंडीसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सज्ज

दहिहंडीसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सज्ज

Subscribe

प्रत्येक मंडळांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याने गोविंदा पथकांच्या सरावाला मे जूनपासून सुरुवात झाली आहे. एकीकडे गोपाळकालाचा सगळीकडे दिसून येत असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलाने जोरदार तयारी केली आहे.

जव्हार: महाराष्ट्र राज्यासह पालघर जिल्ह्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील अष्टमीला सर्वत्र कृष्ण जन्माअष्टमी साजरी करण्यात येते. मध्यरात्री १२ वाजता बाळकृष्णाची मुर्ती पाळण्यात ठेवून पूजा केली जाते. या सणाचे पावित्र्य राखीत सुरक्षितता म्हणून जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी २३ पोलीस अधिकारी व १२५ कर्मचार्‍यांचा फौज फाटा तैनात केला आहे. दहीहंडीचा उत्सव म्हटला की गोविंदांच्या घोषणांनी जव्हार, मोखाडा ,विक्रमगड, वाडा व कासा ही शहरे अगदी दणाणून जातात.यंदा या परिसरात ७१ सार्वजनिक तर २२७ खासगी दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणेच नव्हे तर मुंबईतून देखील मोठ्या संख्येने गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी या शहरात येतात. यात १५ ते २० टक्के तरूणींचा देखील समावेश असल्याचे पहायला मिळते.उंचच उंच थर लावण्यासाठी प्रत्येक मंडळांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याने गोविंदा पथकांच्या सरावाला मे जूनपासून सुरुवात झाली आहे. एकीकडे गोपाळकालाचा सगळीकडे दिसून येत असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलाने जोरदार तयारी केली आहे.

उत्सव नियम आणि अटी
गोविंदा मंडळांना व दहीहंडी आयोजकांना काही नियम आखून दिले आहेत. त्यात दहीहंडीच्या ठिकाणी गाद्या ठेवणे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट सुरक्षा अशा उपाययोजना असाव्यात. तसेच २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधू नये. महत्त्वाचे म्हणजे १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास कोर्टाने सक्त मनाई केली आहे. त्यानुसार लहान मुलांचा दहीहंडी फोडण्यासाठी वापर करू नये. तसेच डीजे व साऊंड सिस्टीमचा आवाज नियमानुसार ६५ डेसीबलपर्यंत ठेवावा, वाहतुकीस अडथळा होईल, अशा ठिकाणी दहीहंडी बांधू नये असे नियम घालून देण्यात आले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -