घर पालघर बोईसरमधील दरोड्याची उकल करण्यात पोलिसांना यश

बोईसरमधील दरोड्याची उकल करण्यात पोलिसांना यश

Subscribe

दरोड्याची घटना घडल्यानंतर बोईसर पोलिसांनी तातडीने वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता.

बोईसर: खासगी कार्यालयावर पडलेल्या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात बोईसर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला अखेर यश आले आहे. बोईसरमधील ओसवाल एंपायर या गजबजलेल्या परिसरातील राजश्री इंटरप्रायजेस या खासगी कार्यालयावर ३ मार्चला पडलेल्या दरोड्याने मोठी खळबळ माजली होती.कार्यालयातील काम करणार्‍या कर्मचार्‍यांना चाकूचा धाक दाखवत तसेच त्यांना दोरीने खुर्चीला बांधून ठेवत रोख रक्कम आणि काही दागिने घेऊन चोर फरार झाले होते.दरोड्याची घटना घडल्यानंतर बोईसर पोलिसांनी तातडीने वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता.

बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मुंबईतील दादरपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक कौशल्य वापरून तपास करीत दादर येथून तीन दरोडेखोरांना ८ मार्च रोजी जेरबंद करण्यात यश मिळवले.तर या दरोड्यातील दोन ते तीन आरोपी फरार झाले होते. यातील अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यावर मुळचा महाराष्ट्रातील पण गेल्या १८ वर्षापासून हिमाचल प्रदेशातील शिमला येथे ट्रेकींग आणि गिर्यारोहण सारख्या साहसी खेळांचे नियोजन करणार्‍या सतीश पोटे (वय ४५ वर्षे) या प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली.त्याची चौकशी केल्यावर या दरोड्याच्या गुन्ह्यात बोईसर येथील महेंद्र वडे (वय ४० वर्षे) आणि सुबोध संखे (वय ४० वर्षे) या दोन स्थानिकांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्यांच्या देखील मुसक्या आवळून अटक केली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट,उपअधीक्षक (गृह) शैलेश काळे,सहायक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे,सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर,सुरेश साळुंके,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक शरद सुरळकर,सुरेश दुसाने,योगेश गावीत आणि मयूर पाटील यांनी दरोड्याची उकल करून सर्व आरोपींना अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

 

राजश्री इंटरप्रायजेस या खासगी कार्यालयात दररोज कोट्यावधी रूपयांचा रोख व्यवहार केला जात असल्याची गुप्त माहिती महेंद्र वडे आणि सुबोध संखे यांनी सतीश पोटे याला पुरवली होती.२००८ साली महेंद्र वडे हा अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात आर्थर रोड तुरुंगात असताना त्याची सतीश पोटे याच्याशी ओळख झाली होती.तेव्हापासून वडे हा पोटेशी संपर्कात होता.राजश्री इंटरप्रायजेस या खासगी कार्यालयात १.५ कोटींची रोख रक्कम असल्याची माहिती पुरवल्यावर ३ मार्च रोजी या कार्यालयावर दरोडा पडला होता.मात्र या ठिकाणी अगदीच फक्त ५६ हजारांची रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागून दरोड्याचा प्रयत्न फसला होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -