घरपालघरआंदोलनाच्या इशाऱ्यानंतर डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू

Subscribe

डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऐना अंतर्गत येणारे दाभोन आरोग्यवर्धनी पथक गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे दाभोन परिसरातील गोरगरीब आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आला होता.

डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऐना अंतर्गत येणारे दाभोन आरोग्यवर्धनी पथक गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे दाभोन परिसरातील गोरगरीब आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आला होता. याबाबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने दखल घेत आरोग्य विभागाला जाब विचारत आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनतर लगेचच आरोग्यवर्धनी पथक दाभोन येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून आंदोलन स्थगित करण्याची मागणी आरोग्य विभागाकडून केली गेली आहे.

आरोग्यवर्धनी पथक हे बंद नव्हतेच. ते सुरूच होते. तेथे सफाई कर्मचारी रोजच साफसफाई करत होते. आरोग्य अधिकारी रोज तपासणीसाठी येत होते. जिल्ह्यात परिचारिकेच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यांची भरती होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा हा भासणारच आहे.
– दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी

- Advertisement -

आरोग्य वर्धनी पथक दाभोन परिसरातील भाग हा अतिशय दुर्गम व आदिवासी बहुल भाग आहे. येथील नागरिक हाताला मिळेल ते काम करून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. दाभोन आरोग्यवर्धनी पथक बंद अवस्थेत असल्यामुळे परिसरातील रुग्ण व गरोदर मातांना उपचारासाठी इतरत्र खासगी दवाखान्यांमध्ये धाव घ्यावी लागत असल्यामुळे जिजाऊ संस्थेने आक्रमक पवित्रा घेत आरोग्य पथक सुरू करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. तसेच दरवर्षी आरोग्याच्या प्रश्नासाठी लाखोंचा निधी खर्च करूनही नागरिकांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नसल्याचा आरोप करत जिजाऊ संस्थेने आरोग्य विभागावर ताशेरे ओढले आहेत.

हे पथक गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याचे आढळून आले असून तेथे रुग्णांऐवजी मोकाट जनावरांची वर्दळ असल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने जिजाऊ संस्थेमार्फत आरोग्य पथक सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. दरवर्षी लाखो रुपये निधी खर्च करून देखील नागरिकांना खासगी दवाखाने गाठावे लागत असतील तर ही मोठी खेदाची बाब आहे.
– जावेद खान, डहाणू तालुका अध्यक्ष, जिजाऊ

- Advertisement -

जिजाऊ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यवर्धनी पथक दाभोन येथील आरोग्य सेवेबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र ऐना येथील वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पथकाला इमारत, डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान देखील उपलब्ध असून आवश्यक ती सर्व पदे मंजूर आहेत. परंतु अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केलेली नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचे माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा –

ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत संतापले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -