घरपालघरआदिम जमातींना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणार

आदिम जमातींना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणार

Subscribe

भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा, वाघिवली, मैदे, पडघा, वसईतील कामण अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून मजूर मुक्त केले आहेत.

वसईः आदिम जमातीच्या नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जातात. तसेच पंतप्रधान जनमन योजने अंतर्गत शिबिरे आयोजित केली जातील, असे आश्वासन आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दीपककुमार मीना यांनी उसगाव येथे बोलताना दिले. वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या मजुरांची सुटका करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी ४० मजुरांची सुटका केली आहे. सध्या त्यांना त्यांना उसगाव डोंगरी येथील साने गुरुजी प्रशिक्षण शिबिर येथे ठेवण्यात आले आहे. भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा, वाघिवली, मैदे, पडघा, वसईतील कामण अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून मजूर मुक्त केले आहेत.

मंगळवारी या वेठबिगार मजुरांची आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दीपक कुमार मीना यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. “मुक्त केलेले सर्व वेठबिगार कातकरी या आदिम जमातीचे आहेत. त्यांच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे दाखले, जॉब कार्ड अशी मूलभूत कागदपत्रे नाहीत. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. म्हणून आम्ही तात्काळ सर्व मजुरांना या मूलभूत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तातडीचे प्रयत्न करत आहोत. वेठबिगारीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या २० मुलांना तात्काळ आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत दाखल करून घेत आहोत” अशी माहिती यावेळी मीना यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

उसगाव येथे सोडवून आणलेले मजूर जव्हार, मोखाडा, वाडा विक्रमगड,पालघर, वसई तालुक्यातील असून त्यांच्याकडे मुलभूत कागदपत्र उपलब्ध झाली की त्यांना त्यांच्या गावाला पाठवून देणार असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. शासनाच्या ज्या योजना आहेत, त्यांची कडक अंमलबजावणी व्हायला पाहिजे. कातकरीच जागेवर नसेल तर त्यांना योजना कशी मिळणार? त्यासाठी अगोदर कातकरीला स्थिर करा. प्रत्येक कातकरी कुटुंबाला चार गुंठे जागा देण्याची मागणीही पंडित यांनी शासनाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -