घरपालघरतब्बल १८ वर्षांनंतर पालिका अभियंता, अग्निशमन अधिकाऱ्यांना पदोन्नती

तब्बल १८ वर्षांनंतर पालिका अभियंता, अग्निशमन अधिकाऱ्यांना पदोन्नती

Subscribe

मिरा भाईंदर महापालिकेनी १८ वर्षानंतर कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेनी १८ वर्षानंतर कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यासोबतच अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोराडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली. तर पालिकेने अजून चार अभियंत्यांना पदोन्नती दिली नाही, त्यांच्यावर न्यायालयीन प्रकरण व विभागीय चौकशीच्या नावाने रखडून ठेवलेली आहे. तर मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले व महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते १० अभियंते व तीन अग्निशमन अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या १६ अभियंत्यांना मागील १८ वर्षांपासून वंचित ठेवलेले होते. तर अभियंत्यांना त्यांना पदोन्नती देण्याच्या विषयाला पालिकेकडून आतापर्यंत मात्र मृग गिळून गप्प असल्याचे दिसून येत होते. मात्र पालिकेने तूर्तास तरी उपअभियंता पदावर पदोन्नती न-देता शाखा अभियंता पदावर तूर्तास १० अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मिरा भाईंदरमधील कनिष्ठ अभियंते २००४ साली शासनाकडून कायमस्वरूपी विविध विभागात काम करत असताना त्यांना नियमानुसार ३ वर्षानंतर शाखा अभियंता पदावर वेतन श्रेणी वाढ देऊन पदोन्नती द्यायला हवी. मात्र २०१४ साली ही पालिकेचे सेवा प्रवेश नियमानुसार त्यांना पालिकेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर सर्व कनिष्ठ अभियंत्यांना ८ वर्षांनंतर उपअभियंता या पदावर पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आलेली होती. मात्र आतापर्यंत १६ कनिष्ठ अभियंत्यावर महापालिका पदोन्नती द्यायला विचार करत नव्हती.

- Advertisement -

शासनाचे नियम व कायद्यानुसार प्रत्येक कनिष्ठ अभियंत्यांना दर तीन वर्षांनी उपअभियंता पदावर पदोन्नती देण्याची तरतूद ठेवलेली आहे. याच धर्तीवर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व ग्राम विकास विभागाच्या सर्व जिल्हा परिषदामध्ये अभियंत्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात आलेली आहे. मात्र याला मिरा भाईंदर मात्र अपवाद ठरले आहे. भारतीय राज्यघटनेने त्यांना दिलेल्या अधिकारांचे हनन करून त्यांना त्यांच्या पदोन्नती पासून वंचित ठेवले कालबद्ध पद्धतीने व काही अभियंत्यांचे ४५ वर्ष वय पूर्ण झालेले असले तरीही महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आलेली होती.

तर पालिका आयुक्त दिलीप ढोले हे सर्व अभियंत्यांना न्याय देणार असेच वाटत होते. त्यावरून शेवटी त्यांनी पालिकेतील रखडलेल्या १० कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंता पदाऐवजी शाखा अभियंता पदावर पदोन्नती दिली आहे. त्यात शिरिषकुमार पवार, प्रांजल कदम, सतीश तांडेल, राजेंद्र पांगळ, अरविंद पाटील, भुपेश काकडे, उत्तम रणदिवे, उमेश अवचर व सचिन पाटील आणि यतीन जाधव तसेच अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोराडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली. यावेळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्यासह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी दिपक खांबीत हे उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा –

Hindutva: महाराष्ट्र दिनी ठाकरे आमने सामने, औरंगाबादला राज ठाकरेंची, तर पुण्यात उद्धव ठाकरेंची सभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -