Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर पालघर कुंभार्डा व खोपरा गावाच्या रस्त्याचा प्रस्ताव शासनाला सादर

कुंभार्डा व खोपरा गावाच्या रस्त्याचा प्रस्ताव शासनाला सादर

Subscribe

त्यामुळे महापालिकेने सध्या वापरत असलेला रस्ता विकास आराखड्यात दाखवून तो तयार करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव मंजूर केला आहे. तो ठराव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील कुंभार्डा व खोपरा गावात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पक्का रस्ता नाही. हा रस्ता बनवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांची मागणी आहे. परंतु या रस्त्याला शासनाची मंजुरी मिळत नसल्याने हा रस्ता बनवण्यात येत नव्हता. परंतु हा रस्ता बनवून रहिवाशांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने प्रस्तावित रस्त्यात फेरबदल करून प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाला सादर केला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात अनेक गावे आहेत. या गावाला सुविधा उपलब्ध करून देणे महापालिकेचे काम आहे. परंतु विकास आराखडा जुना असल्यामुळे या सुविधा उपलब्ध करून देण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे प्रस्तावित रस्त्यामध्ये फेरबदल करून शासनाकडून याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यामुळे कुंभार्डा, खोपरा या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळे पाण्याची सुविधा देखील देता येत नाही. तसेच रस्त्याने विजेचे दिवे देखील लावता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून जवळपास तीन किलोमीटर पायी चालत जावे लागते. पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावर पूर्ण चिखल असतो.

या चिखलातून नागरिकांना गावात जावे लागते. या गावात कोणी आजारी पडल्यास त्या रुग्णाला अत्यावश्यक सुविधा देखील मिळण्यास अडचण निर्माण होते. यामध्ये एखाद्याचा उपचाराअभावी मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे येथील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून गावाला रस्ता मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु हा रस्ता बनवण्यासाठी मुख्य अडचण म्हणजे गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे तो मिठागरे व खासगी जमिनीतून जाणारा आहे. तसेच मंजूर विकास आराखड्यात असलेला प्रस्तावित रस्ता हा डोंगरातून जात असल्याने तो विकसित करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे महापालिकेने सध्या वापरत असलेला रस्ता विकास आराखड्यात दाखवून तो तयार करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव मंजूर केला आहे. तो ठराव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

- Advertisement -

महापालिकेकडून कार्यवाहीस विलंब ?

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी रस्त्याच्या फेरबदलासाठी जागामालकांची सुनावणी घेऊन तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पुन्हा शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्देश महापालिकेला दिले होते. परंतु अनेक महिने उलटूनही महापालिकेकडून कार्यवाही करण्यास विलंब केला जात होता. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या अनेक महिन्याच्या विलंबानंतर अखेर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून महापालिकेकडून शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाने या प्रस्तावाला लवकर मंजुरी देऊन पावसाळ्यापूर्वी हा रस्ता बनवण्यात यावा अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -