घरपालघरपालिकेच्या बस भाड्यात वाढ व कपात करण्याचा प्रस्ताव

पालिकेच्या बस भाड्यात वाढ व कपात करण्याचा प्रस्ताव

Subscribe

तर नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी व जीसीसी तत्वावर चालवण्यासाठी कंत्राटदार निश्चित केला आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिकेच्या परिवहन बस सेवेतील भाडेवाढ व कपातचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुंबई महानगर क्षेत्राच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अध्यक्षांकडे पालिका आयुक्तांनी पाठवला आहे . १० वर्षांनी भाडेवाढ होणार असून साधारण बसची भाडेवाढ २ ते १२ रुपये इतकी तर वातानुकूलित बसचे भाडे मात्र ५ ते १० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या ७४ बसची सेवा फेब्रुवारी २०२१ पासून तात्पुरत्या स्वरूपात मे . महालक्ष्मी कृपा इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारामार्फत एनसीसी विथ व्हीजीएफ तत्वावर चालवली जात आहे . तर नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी व जीसीसी तत्वावर चालवण्यासाठी कंत्राटदार निश्चित केला आहे.

साधारण बसचे भाडे २०१३ साली तर वातानुकूलित बसचे भाडे २०१६ साली ठरवल्यानंतर आजपर्यंत त्यात फेरबदल व वाढ केली गेलेली नाही . गेल्या १० वर्षात डिझेल पासून स्पेअरपार्ट , देखभाल दुरुस्ती आदीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . मात्र सध्या बस भाड्यात वाढ न झाल्याने पालिकेवर अधिकच बोजा पडत आहे, असे प्रशासनाचे मत आहे. त्या अनुषंगाने २८ मार्च रोजीच्या प्रशासकीय बैठकीत परिवहन विभागाने साधारण बसच्या भाड्यात किमान ४ रु . ते १३ रुपये वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता . मात्र आयुक्त दिलीप ढोले यांनी किमान ४ रुपयां ऐवजी २ रुपये इतकी भाडेवाढ मंजूर केली. सध्या पालिकेचे किमान भाडे २ किमीपर्यंत ६ रुपये असून ते ८ रुपये तर ८ रु . चे १० रु . ; ११ चे १३ रु . व १३ रु. चे १५ रु . ; १५ रु चे १८ रु. अशा पद्धतीने पुढील टप्प्यास देखील भाडेवाढ मंजूर केली आहे. सध्याचे कमाल ३२ रुपये भाडे हे ४३ रुपये केले आहे. एकूण साध्या बस भाड्यात किमान २ रु. ते कमाल १२ रुपयांपर्यंतची भाडेवाढ करण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. दुसरीकडे वातानुकूलित बसच्या भाड्यात मात्र आयुक्तांनी कपात केली आहे. किमान भाडे ५ रु. ते १० रुपये इतके कमी केले आहे. सध्याचे किमान भाडे २० रुपयांवरून १५ रुपये तर कमाल १०० रुपयांवरून ९० रुपये असे केले आहे. बस भाडेवाढ व कपातीचा ठराव अंतिम मंजुरीसाठी आयुक्त ढोले यांनी मुंबई महानगर क्षेत्राच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अध्यक्षांकडे अंतिम मजुरीसाठी पाठवला आहे . त्यांच्या मंजुरी नंतर बस भाड्यात वाढ व वातानुकूलित बस भाड्यात कपात अमलात येणार आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -