घरपालघरचित्रपटात काम करण्याचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय

चित्रपटात काम करण्याचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय

Subscribe

वेश्याव्यवसाय करुन घेणार्‍या २ पुरुष वेश्या दलालांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाने कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून ४ पीडित मुलींची सुटका केली आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर आणि आजूबाजूच्या शहरांत चित्रपट आणि मालिकांचे काम जोरात सुरू असते.अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे येत असतात.परंतु,या स्वप्नांचा फायदा घेऊन फसवणूकीचे प्रकार घडत असतात.अशाच एका प्रकरणात मुलींना फसवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेणार्‍या २ पुरुष वेश्या दलालांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाने कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून ४ पीडित मुलींची सुटका केली आहे.

मुंबईतील मढ आयलँड, मालाड परिसरात राहणार्‍या वेश्यादलाल सोलोमन नारकांथोल्लु (चित्रपट निर्माता) आणि त्याचा साथीदार चंद्राराज उर्फ मायकल मुत्तीपोगु यांच्या संपर्कात हिंदी मालिका, वेब सिरीज, फोटो शूट आणि युट्युबवर साईड हिरोईन म्हणून काम करणार्‍या मुली होत्या. निर्माता सुलेमान नारकांथोल्ल्यु हा या मुलींना मीरा-भाईंदर, गोराई (बोरीवली) मुंबई, ठाणे, लोणावळा, दमन या परिसरांतील लॉजमध्ये गिर्‍हाईकास रुम बुक करायला लावीन किंवा गिर्‍हाईकांच्या सोयीनुसार वेश्यागमनाचा व्यवसाय करत होता. त्याचा मोबदला म्हणून तो ४० हजार रुपये घेत होता अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बोगस गिर्‍हाईक आणि दोन पंच बोलावून वेश्यादलाल सोलोमन नारकांथोल्लु याने सांगितलेल्या ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहायक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, सम्राट गावडे, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपूत, महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे आणि शितल जाधव यांनी छापा टाकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -