घरपालघरतनिष्का मृत्यू प्रकरणी जनआक्रोश

तनिष्का मृत्यू प्रकरणी जनआक्रोश

Subscribe

महावितरणच्या तीन अधिकार्‍यांनाही जामिनावर सोडण्यात आलेले आहे. याशिवाय तनिष्का कांबळे हिच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून २० हजार रुपये वगळता महावितरणने मदत केलेली नाही.

वसई : बेपर्वा व्यवस्थेचा बळी ठरलेल्या तनिष्का कांबळेप्रकरणी जनता दल (से) वतीन वीजतज्ञ प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेण्यात आला होता. यात शिवसेनाही सहभागी झाली होती. विरार पश्चिम-बोळींज येथील मथुरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारी तनिष्का कांबळे (१५) ही विद्यार्थिनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरातीलच ज्ञानसागर या शिकवणीकरता घरातून निघाली होती. त्यावेळी पावसामुळे रस्त्यात साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने तनिष्काला विजेचा धक्का बसला होता व त्यात तिचा मृत्यू झाला होता.मात्र, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासही टाळाटाळ करत उशिराने गुन्हा दाखल केला होता. वाढत्या जनआक्रोशानंतर अर्नाळा पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी भारतीय दंड संहिता ३०४ अ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र, यात दोषींच्या नावांचा उल्लेख केलेला नाही. महावितरणच्या तीन अधिकार्‍यांनाही जामिनावर सोडण्यात आलेले आहे. याशिवाय तनिष्का कांबळे हिच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून २० हजार रुपये वगळता महावितरणने मदत केलेली नाही.

या सगळ्याच्या निषेधार्थ व महावितरणच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीकरता जनता दल(से) च्या वतीने ’आक्रोश मोर्चा’चे काढण्यात आला होता. यामोर्चात शिवसेनाही सहभागी झाली होती. विजतज्ञ प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मनवेल तुस्कानो, वसई-विरार जिल्हाध्यक्ष कुमार राऊत, शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, जनता दलाचे उपाध्यक्ष पायस मच्याडो, सदस्य जितेंद्र सत्पाळकर, रघुनाथ कळभाटे आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -