घरपालघरवाड्यात लसीकरणासाठी पहाटेपासून रांग

वाड्यात लसीकरणासाठी पहाटेपासून रांग

Subscribe

वाडा ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणाचे सत्र २७ ऑगस्टला घेणार असल्याची माहिती एकदिवस अगोदरच प्रसारित झाल्याने शुक्रवारी पहाटेपासून रुग्णालयात रांग लावली होती.

वाडा ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणाचे सत्र २७ ऑगस्टला घेणार असल्याची माहिती एकदिवस अगोदरच प्रसारित झाल्याने शुक्रवारी पहाटेपासून रुग्णालयात रांग लावली होती. १८ ते ४४ वयोगतील व्यक्तींचे लसीकरणाचे सत्र तीन महिन्यांनंतर ठेवल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रामीण रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रापासून सुरू झालेली राग बाहेर रस्त्यावरील वाचनालयापर्यंत होती. सुरुवातीच्या काळात लसीकरणाबाबत अनेक शंका निर्माण केल्या जात होत्या, भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आता लस घेण्याचे महत्व पटल्याने तरुणांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

वाडा ग्रामीण रुग्णालयात ३००, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नेहरोली ३००, प्राथमिक ओराग्य उपकेंद्र भावेघर ११०, जिल्हा परिषद शाळा हमरापुर ३००, प्राथमिक आरोग्य पथक सोनाळे १५०, प्राथमिक आरोग्य पथक गारगांव १५०, ग्रामपंचायत डाकिवली १००, ग्रामपंचायत घोनसई १०० व ग्रामपंचायत कांभरे१०० या प्रमाणे लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. रेल्वे प्रवासासाठी दोन्ही लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने लसीकरण केंद्रावर परप्रांतीयांची गर्दी प्रामुख्याने जाणवली.

- Advertisement -

लसीकरणाचे सत्र सकाळी टोकन दिल्यानंतर ९.३० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होते. या दरम्यान जास्तीत जास्त २०० जणांचे लसीकरण होऊ शकले. उर्वरित सत्र उद्या घेण्यात येणार आहे. ३०० डोसपैकी ३० टक्के डोस दुसरा डोस घेणाऱ्यांना मिळेल.
– प्रल्हाद पाटील, लॅब टेक्निशियन

गरोदर माता, स्तनदा माता व अपंगांना रांगेत उभे रहायचे नाही. त्यांना तात्काळ लस दिली जाईल. तर जेष्ठ नागरिकांचा दुसरा डोसही तात्काळ देण्याच्या सूचना केल्या आहेत. मागणी केल्याप्रमाणे पुरवठा होत नसल्याने गर्दी होत आहे.
– डॉ. सुनिल भडांगे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयात, वाडा

- Advertisement -

परप्रांतियांना लस देण्याअगोदर स्थानिक नागरिकांना प्राधान्यांने लसीकरण केले पाहिजे, अशी मागणी आम्ही शासनदरबारी केली आहे.
– भीमराव बागुल, रुग्णमित्र संघटना, वाडा

हेही वाचा –

भान ठेवून बोलले असते तर अटक झाली नसती, राणेंच्या अटकेवर अजितदादांचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -