मनोर:पालघर जिल्ह्यात रब्बी हंगामातील लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र 4500 हेक्टर असून यंदाच्या हंगामात कृषी विभागाकडून मोफत बियाणे वाटप आणि लागवड प्रात्यक्षिकांमुळे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा लागवड केली जाते. इतर पिकांमध्ये वाल, मटकी, कुळीथ, तिळाची लागवड केली जाते.भाजीपाला लागवडीचे क्षेत्र 4500 हेक्टर असून मिरची,तसेच वेल वर्गीय कारले,दोडका, काकडी, कारले आणि दुधीची लागवड केली जाते.
रब्बी पिकांच्या लागवडीमध्ये पालघर जिल्ह्यात हरभर्याची पेरणी १ हजार 920 हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे.हरभर्याचे सरासरी क्षेत्र 1350 हेक्टर असून यंदा पेरणी 142 टक्के झाली आहे.इतर कडधान्याच्या लागवडीमध्ये वाल,मटकी, कुळीथ लागवडीचे सरासरी क्षेत्र २ हजार 800 हेक्टर आहे. यंदाच्या रब्बी हंगामात तीन हजार 400 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.इतर कडधान्याची पेरणी 127 टक्के झाली आहे. पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत काळ्या तिळाची लागवड केली जाते.काळ्या तिळाच्या लागवडीचे क्षेत्र 644 हेक्टर आहे.पाच तालुक्यांपैकी पालघर तालुक्यात सर्वाधिक 385 हेक्टर क्षेत्रात तर विक्रमगड तालुक्यात 140 हेक्टर क्षेत्रात तिळाची लागवड करण्यात आली आहे. तेलबिया लागवडी अंतर्गत सूर्यफूलाची लागवड करण्यात येते. यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात 50 हेक्टर क्षेत्रात सूर्यफूलाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात भाजीपाला लगावडीचे क्षेत्र 4500 हेक्टर पर्यंत आहे.प्रामुख्याने मिरची,दोडका,काकडी,कारले आणि दुधीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
मोफत बियाणे वाटप आणि लागवड प्रात्यक्षिकसारख्या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यात रब्बी हंगामातील लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.शेतकर्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग कार्यरत आहे.
-निलेश भागेश्वर,जिल्हा कृषी अधिकारी, पालघर