Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर पालघर सभापतीपदी राजेंद्र पाटील तर उपसभापतीपदी प्रभाकर पाटील

सभापतीपदी राजेंद्र पाटील तर उपसभापतीपदी प्रभाकर पाटील

Subscribe

व्यापारी संवर्गातील दोन संचालक पदावर एकमत न झाल्याने दोन जागांसाठी निवडणूक झाली होती.

मनोर: पालघर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजेंद्र पाटील तर उपसभापतीपदी प्रभाकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.संचालक पदांच्या सर्वच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले होते.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील निवडून आल्याने शिवसैनिकांनी जल्लोष केला. पालघर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पाच,बविआ सहा, राष्ट्रवादी काँग्रेस तीन आणि काँग्रेसचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.व्यापारी संवर्गातील दोन संचालक पदावर एकमत न झाल्याने दोन जागांसाठी निवडणूक झाली होती.

यात बहुजन विकास आघाडीचे पंकज शाह आणि हिम्मत पटेल संचालक निवडून आले होते. पन्नास वर्षांच्या काळात पालघर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचा सभापती विराजमान होण्याची पहिली वेळ आहे.पालघर तालुक्यात सहकार क्षेत्रावर काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे वर्चस्व होते.यंदाच्या निवडणुकीत महाआघाडी झाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला बिनविरोध सभापती पद देण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -