Eco friendly bappa Competition
घर पालघर राखी हिंदू-ख्रिस्ती ऐक्याची

राखी हिंदू-ख्रिस्ती ऐक्याची

Subscribe

वसई- विरार शहरात शेकडो वर्षांपासून हिंदू ख्रिस्ती ऐक्याची परंपरा या उभयधर्मीय नागरिकांकडून सामाजिक जाणिवेतून जोपासली जात असून, नाताळ आणि दिवाळी हे मोठे सण बर्‍याच हिंदू आणि ख्रिस्ती परिवारात साजरे होताना दिसतात.

वसई: वसई- विरार शहरात शेकडो वर्षांपासून हिंदू ख्रिस्ती ऐक्याची परंपरा या उभयधर्मीय नागरिकांकडून सामाजिक जाणिवेतून जोपासली जात असून, नाताळ आणि दिवाळी हे मोठे सण बर्‍याच हिंदू आणि ख्रिस्ती परिवारात साजरे होताना दिसतात. बुधवारी झालेला राखी पौर्णिमेचा सणही वसई पश्चिमेच्या गास गावातील सामाजिक कार्यकर्ते अँड. जॉर्ज फरगोज यांच्या कुटुंबातील छोट्या चौघा बहीण- भावंडांनी उत्साहाने साजरा केल्याचे पाहायला मिळाले.गास येथील उच्चशिक्षित फरगोज परिवार आजच्या धकाधकीच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही आपली गांव संस्कृती आणि त्यासोबतच एकत्रित कुटुंब पद्धती जोपासून आहे. अ‍ॅड. जॉर्ज फरगोज आणि त्यांच्या पत्नी सौ. निर्मला जॉर्ज फरगोज या दांपत्याने घरातील चौघा लहानग्या बहीण-भावंडाच्या स्नेह भावनेला प्रोत्साहन देत, रक्षाबंधन सण साजरा करून स्वतः ही आनंद लुटला. अ‍ॅड. जॉर्ज यांची कु. जेनेसीस आणि कु. जिओनील ही दोन मुलगे, तसेच जॉर्ज यांच्या भावाची पाच वर्षीय मुलगी कु. स्टिओरा आणि मुलगा स्टेरेन यांनी भावा-बहिणीच्या पवित्र नात्यातील भाव-बंधाची जोपासना हिंदू परंपरेनुसार केली. कु. स्टिओरा हीने तिच्या चिमुकल्या हातांनी भाऊ स्टेरेन, तसेच चुलत भावंडे जेनेसीस आणि जिओनील या तिघांना राखी बांधली. या तिघांनी तिला रोख ओवाळणीही घातली.

वसईत हिंदू आणि ख्रिस्ती असा धार्मिक भेद खूपच मोजक्यावेळी अपवादाने पाहायला मिळतो. आमच्या बोली-भाषा, चाली-रीती एकच असून परस्पर स्नेह भावना सुद्धा वाडवडिलांपासून परंपरेने चालत आली आहे. दिवाळी, गणेशोत्सवाप्रमाणेच अनेक सणात आम्ही भाग घेतो. हिंदू बांधवही आमच्या नाताळ आणि अन्य सणातही एकत्र येतात. मी ही लहानपणी रक्षाबंधन करीत आलो. आता आमची लहान मुलेही हा सण घरात आग्रहपूर्वक साजरा करून आम्ही सर्वच त्यातून आनंद घेतो.
—– अ‍ॅड. जॉर्ज फरगोज,
ज्येष्ठ वकील, तथा सामाजिक कार्यकर्ते, गास.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -