Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरRape Case: मनोरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Rape Case: मनोरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Subscribe

पीडितेच्या फिर्यादी नंतर दोन्ही आरोपीविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मनोर: मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणांनी अल्पवयीन मुलीला धमकावून आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पीडितेच्या फिर्यादी नंतर दोन्ही आरोपीविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानीवली गावातील दोन तरुणांनी गावातील अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्याच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.याप्रकरणी पीडितेने मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालया अंतर्गत मांडवी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली होती.पीडितेच्या फिर्यादी वरुन मांडवी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (7).65 (1),70 (2) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम 4,5 (एन) 6,8,9 (ग).10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा पालघर तालुक्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने गुन्हा मनोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.गुन्ह्याची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी सूत्रे हलवत दोन्ही आरोपींना अटक केली.अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून आरोपींची रवानगी पोलीस कोठडी करण्यात आली आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -