घरपालघरदोन कोटी ९५ लाखांची थकीत एलबीटीची वसुली

दोन कोटी ९५ लाखांची थकीत एलबीटीची वसुली

Subscribe

मीरा -भाईंदर महापालिकेत पूर्वी जकात वसुली केली जायची. मात्र राज्य शासनाने जकात बंद केल्यानंतर एलबीटी लागू करण्यात आली आहे. एलबीटी वेग वेगळ्या प्रोडक्टवर वेगवेगळी चार्ज केली जाते.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महानगर पालिकेच्या वतीने २०२२-२३ या वर्षात २ कोटी ९५ लाख ८६ हजार ७०२ रुपये एलबीटीची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक संस्था कर ( एलबीटी ) विभागाकडून देण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत अजून एलबीटीची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मीरा -भाईंदर महानगर पालिकेकडून २०२१-२२ मध्ये थकित एलबीटी धारकांना ६ हजार ७२३ नोटिसा देत जवळपास २०२१-२२ या वर्षात ४ कोटी २४ लाख १३ हजार हजार रूपयांची एलबीटी वसुली केली होती. २०२२-२३ मध्ये ४ हजार ३५८ नोटिस देत २०२२-२३ या चालू वर्षात जवळपास २ कोटी ९५ लाख ८६ हजार रूपयांची एलबीटी वसुली करण्यात आली आहे. मीरा -भाईंदर महापालिकेत पूर्वी जकात वसुली केली जायची. मात्र राज्य शासनाने जकात बंद केल्यानंतर एलबीटी लागू करण्यात आली आहे. एलबीटी वेग वेगळ्या प्रोडक्टवर वेगवेगळी चार्ज केली जाते.

त्यानंतर काही वर्षांने केंद्र सरकारने पूर्ण देशात जीएसटी लागू केली. जीएसटी लागू केल्यामुळे २०१६-१७ या वर्षात एलबीटी बंद करण्यात आली आहे. एलबीटी बंद केल्यामुळे शहरातील व्यापार्‍यां कडून करोडो रुपये एलबीटी वसूल करणे बाकी राहिले होते. मीरा -भाईंदर शहरातील एलबीटी विभागाची जबाबदारी महानगर पालिकेने सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले यांना दिल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात एलबीटीच्या थकीत रक्कमेची वसुली केली आहे. एलबीटीची थकित वसुली करण्यासाठी नोटिस देण्यात येतात. त्यानंतर पण एलबीटिची थकित रक्कम न भरल्यास त्यांना आठवण करून देण्याकरता स्मरण पत्र देण्यात येते व त्यानंतर कारवाई करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -