Eco friendly bappa Competition
घर पालघर जिल्ह्यात लवकरच प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समिती

जिल्ह्यात लवकरच प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समिती

Subscribe

त्यासाठी आरटीए स्थापन करण्याची आग्रही मागणी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे करण्यात आली असता त्यांनी आरटीए आठ दिवसात स्थापना केली जाईल, अशी ग्वाही दिली.

वसईः पालघर जिल्हा स्थापन होऊन नऊ वर्षे उलटली तरी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समिती (आरटीए) स्थापन झाली नसल्याने प्रवाशी वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याकडे जिल्हयातील विविध संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी येत्या आठ दिवसात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समिती नियुक्त केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले. पालघर जिल्हा स्थापनेपासून प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए) समिती अद्याप स्थापन अस्तित्वात नसल्याने पालघर जिल्ह्यात विक्रम मिनी डोअर, तीन चाकी, सहा आसनी ऑटोरिक्षा(डम डम), ऑटोरिक्षा , टॅक्सी, तीनचाकी ऑटोरिक्षा यांना भेडसावणार्‍या समस्या व त्यांचे प्रश्न मार्गी लागत नव्हते. त्यासाठी आरटीए स्थापन करण्याची आग्रही मागणी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे करण्यात आली असता त्यांनी आरटीए आठ दिवसात स्थापना केली जाईल, अशी ग्वाही दिली.

पालघर जिल्ह्यातील विक्रम मिनी डोअर, तीन चाकी, सहा आसनी ऑटोरिक्षा(डमडम) ची ग्रामीण तालुक्यामध्ये चालणार्‍या रिक्षांची वयोमर्यादा संपली होती. परिणामी त्यांच्या व्यवसायावर गंडांतर आले होते. यासाठी डमडम रिक्षाची वयोमर्यादा २७ वर्ष रायगड जिल्ह्याच्या धर्तीवर वाढवण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव सादर केला होता. त्याची कार्यवाही करावी, असा आग्रह संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी धरला. याबाबतीतही जिल्हाधिकार्‍यांना सकारात्मक भूमिका घेतली. या बैठकीत वसई प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले ,ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष महेश कदम,नवनिर्माण ऑटो रिक्षा टॅक्सी टेम्पोचे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष मधुसुदन राणे, महासंघाचे संस्थापक विजय खेतले, श्रमिक संघटनेचे पदाधिकारी संजय पाटील, कार्याध्यक्ष अरविंद पाटील, उपाध्यक्ष रफिक शेख , उपाध्यक्ष चंद्रकांत भोईर ,उपाध्यक्ष नारायण घाडी, विरार शहर अध्यक्ष अरविंद गावडे, राजेंद्र चव्हाण, आकाश राजभोज, गोपाळ तडसे, अमजद भाई उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्ह्यात सीएनजी गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी देखील यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यात गुजरात गॅस पुरवठा करणार्‍या अधिकार्‍यांची बैठक महासंघाच्या पदाधिकार्‍यासोबत लवकरच घेण्यात येईल. त्यामध्ये सीएनजी गॅस पुरवठा कशाप्रकारे सुरळीत राहील याकडे लक्ष दिले जाईल, असेही आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -