Eco friendly bappa Competition
घर पालघर ट्रस्टची नोंद रद्द करून शेतकर्‍यांची नोंद करा

ट्रस्टची नोंद रद्द करून शेतकर्‍यांची नोंद करा

Subscribe

त्या जमीन मिळकतीवर सदर गावातील शेतकरी उदरनिर्वाह करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत आहेत. शेतीशिवाय अन्य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन या शेतकर्‍यांना नाही.

पालघरः विक्रमगड तालुक्यात डोल्हारी बुद्रुक गावातील १४५ आदिवासी कुटुंबांच्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर एका देवस्थान ट्रस्टची नोंद झाली आहे. त्या जमिनी आदिवासी कुटुंबे १९५२ सालापासून कसत असल्याने सातबारावरील देवस्थान ट्रस्टची नोंद कमी करून आदिवासी शेतकर्‍यांची खातेदार म्हणून नोंद करावी, अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी बु.येथील शेतकर्‍यांनी निकम यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी तडक जिल्हाधिकारी बोडके यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. जमीन १९५२ सालापुर्वीपासून गावकर्‍यांच्या ताब्यात वहिवाटीत लागवडीखाली आहे. त्या जमीन मिळकतीवर सदर गावातील शेतकरी उदरनिर्वाह करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत आहेत. शेतीशिवाय अन्य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन या शेतकर्‍यांना नाही.

या जमिनीवर शेतकरी लागवड करत असून त्यांची ७/१२ व इतर अधिकारामध्ये नावे दाखल केलेली आहेत. परंतु १९६९ साली भोगवटादार म्हणून एन. बी. गोसावी, त्र्यंबकराव नारायण राजेबहादुर, नारायण भगवंत कुलकर्णी, नॉमिनेटेड बाय डि जज्ज नासिक, मे. असिस्टंट जज्ज डि कोर्ट नासिक, व्हि. एस. डि. पटवर्धन, व्हि. पी. गुप्ते, श्रीकृष्ण नारायणराव बाळाजीवाले, श्री. व्यंकटेश बालाजी संस्थान यांच्या नावाची नोंद झाली असल्याकडे निकम यांनी जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले. सदरची जमीन शेतकरी लागवड करीत असून त्यांच्या ताब्यात लागवडीखाली आहे. या शेतकर्‍यांशिवाय या जागेवर इतर कुणाचाही ताबा नसून ही जमीन वडिलोपार्जितपणे लागवड करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नावाची नोंद इतर अधिकारातून कमी करून सातबाराला भोगवटादारामध्ये व खातेदार म्हणून ८ अ वर नोंद करून मिळावी. भोगवटादार म्हणून असलेली नावे कमी करून करावी, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करू, असे आश्वासन निकम यांनी यावेळी शेतकर्‍यांना दिले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -