एसटीपी प्लांटच्या विरोधात रहिवाशांचे धरणे आंदोलन

मीरारोडच्या म्हाडा वसाहतीमध्ये शेकडो स्थानीय रहिवाशांनी एसटीपी प्लांट (मल निस्सारण केंद्र) च्या विरोधात धरणे आंदोलन केले.

मीरारोडच्या म्हाडा वसाहतीमध्ये शेकडो स्थानीय रहिवाशांनी एसटीपी प्लांट (मल निस्सारण केंद्र) च्या विरोधात धरणे आंदोलन केले. त्या परिसरातील रहिवाशांना एसटीपी प्लांटमधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. मीरारोड येथील म्हाडा वसाहतीमधील एसटीपी प्लांटमधून निघणाऱ्या मीथेन, हाइड्रोजन सल्फाइट, अमोनिया, हवेत पसरणाऱ्या किटाणू, दुषित गॅसमुळे तेथील रहिवाशांना आरोग्या विषयीच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. हा प्लांट रहिवाशी वस्तीत उभारला असून सुरुवातीला त्याला रहिवाशांनी विरोध केला. त्यावेळी २०१९ मध्ये हा प्लांट बंद करण्यात आला होता. त्यावेळी या प्लांटमध्ये सफाई करताना तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन महिन्यापासून पुन्हा हा प्लांट सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी या प्लांटच्या विरोधात धरणे आंदोलन केले. या प्लांटच्या आजूबाजूला १२ सोसायटीची वसाहत १२३६ घरे आहेत. त्यामध्ये जवळपास ७००० नागरिक वास्तव करत आहेत. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

एसटीपी प्लांट

सोमवारी सकाळी रहिवाशी मोठ्या संख्येने एसटीपी प्लांट (मल निस्सारण केंद्र) च्या जवळ जमा होऊन धरणे आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात आली. हे आंदोलन सुरू होताच तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा आला. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त दिलीप ढोले, पोलीस उपायुक्त अमित काळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी १५ दिवसाची वेळ मागितली असून आईआईटीच्या अभियंत्यांद्वारे तपासणी करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्या प्लांटची दुर्गंधी पसरणार नाही. या दुर्गंधीपासून तसेच रहिवाशांना होणाऱ्या त्रासातून सुटका केली जाईल, असे आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले. हे आंदोलन १५ दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे. १५ दिवसात रहिवाशांना होणारी समस्या सोडवली नाही, तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी सांगितले.

हेही वाचा –

राज ठाकरेंसह सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावणार, दिलीप वळसे-पाटलांची माहिती