घरपालघररिसॉर्ट-कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांच्या प्रतीक्षेत

रिसॉर्ट-कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांच्या प्रतीक्षेत

Subscribe

स्थानिकांना रोजगार मिळवून देतानाच लाखो रुपयांची उलाढाल आणि हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून असलेली शेकडो रिसॉर्ट-कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.

स्थानिकांना रोजगार मिळवून देतानाच लाखो रुपयांची उलाढाल आणि हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून असलेली शेकडो रिसॉर्ट-कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत. कोविड प्रतिबंधक नियमांत शिथिलता आली असली तरी पर्यटकांचा ओघ कमी असल्याने वसईसह पालघर जिल्ह्यातील शेकडो रिसॉर्ट-कृषी पर्यटन केंद्र ओस पडलेली दिसत आहेत. वसई विरारसह पालघर जिल्ह्यात शेकडो रिसॉर्ट, वॉटर पार्क आणि कृषी पर्यटन केंद्र आहेत. मुंबईजवळ व वाजवी दर असल्याने मुंबई, गुजरात, ठाणे आणि अन्य परिसरातून शनिवार-रविवारसह अन्य सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटक याठिकाणी आनंद लुटण्याकरता येत होते.

स्थानिकांना रोजगार, लाखो रुपयांची उलाढाल आणि हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून होती. मात्र कोविड संक्रमणानंतर या व्यवसायाचे पार कंबरडे मोडले आहे. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे रिसॉर्ट व कृषी पर्यटन स्थळांना कुलूप लावण्याची वेळ आली होती. याचे परिणाम म्हणून याठिकाणी काम करणाऱ्या आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले होते. या जागांच्या देखभाल आणि रखरखाव यावर खर्च करावा लागत असल्याने व्यावसायिकही मेटाकुटीस आले होते. यथावकाश ऑक्टोबर महिन्यात कोविड प्रतिबंधक नियमांत शिथिलता आली असली तरी कोरोना काळाचा प्रभाव अद्याप या व्यवसायावर असल्याचे काही रिसॉर्ट आणि कृषी पर्यंटन केंद्रांचे व्यवस्थापक सांगतात.

- Advertisement -

शहरापासून दूर, नीरव शांतता आणि निसर्गसौंदर्य असल्याने या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोविडपूर्वी याठिकाणी सुट्टी आणि अन्य दिवशी या ठिकाणी शेकडो लोकांचा राबता असायचा. शेती अभ्यासक, चित्रपटसृष्टीतील कलाकर जाणीवपूर्वक या कृषी पर्यटनस्थळाला भेटी देत असल्याचे सांगितले जाते. ‘लॉकडाउन’ काळात हे कृषी पर्यटनस्थळ आणि येथील रिसॉर्ट बंद होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी संख्या वाढलेली नाही. त्यामुळे या व्यवसायाला अद्याप उभारी आलेली नसल्याचे येथील व्यावसायिक सांगतात.

हेही वाचा – 

चंद्रकांत पाटलांना उत्तर दिल्यास त्यांची प्रकृती बिघडेल, संजय राऊतांचा पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -