फ्लाईंग राणीचा महिला डबा पुन्हा सुरु करा; महिला प्रवाशांची मागणी

एक्‍स्प्रेसला असलेल्या महिलांचे डबे काढून त्याजागी छोटा डबा दिल्याने त्यात अपुरी जागा असल्यामुळे सर्व महिलांना गेल्या वर्षभरापासून जनरल डब्यात प्रवास करावा लागत आहे.

सूरतवरून मुंबईकडे येणारी फ्लाईंग राणी एक्सप्रेस डहाणू, पालघरच्या चाकरमानी महिला वर्गांसाठी सोयीची ठरत होती. मात्र या एक्‍स्प्रेसला असलेल्या महिलांचे डबे काढून त्याजागी छोटा डबा दिल्याने त्यात अपुरी जागा असल्यामुळे सर्व महिलांना गेल्या वर्षभरापासून जनरल डब्यात प्रवास करावा लागत एक्‍स्प्रेसला असलेल्या महिलांचे डबे काढून त्याजागी छोटा डबा दिल्याने त्यात अपुरी जागा असल्यामुळे सर्व महिलांना गेल्या वर्षभरापासून जनरल डब्यात प्रवास करावा लागत आहे. आहे. महिलांना प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारचे रेल्वे खाते इथे मात्र महिलांची कुचंबणा करत असल्याची प्रतिक्रिया मातृदिनी महिलांनी व्यक्त केली. डहाणू व पालघरवरून सकाळी मुंबईला जाताना व संध्याकाळी परतीच्या प्रवासात सुमारे तीनशे ते चारशे महिला कामानिमित्त रोजचा प्रवास फ्लाईंग राणीने करतात. यापूर्वी साधा महिलांचा एक डबा व पासधारक महिलांसाठी स्वतंत्र डब्याची व्यवस्था होती. हे दोन डबे नेहमी महिलांनी गच्च भरलेले असत. संपूर्ण डब्यात महिलाच असल्याने खेटून उभे राहण्यासही त्यांना संकोच वाटत नसे. मात्र सध्या पुरुषांच्या बरोबरीने जनरल डब्यात प्रवास करताना महिलावर्गाला त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलांनी म्हटले आहे.

रेल्वे खाते प्रवासी महिलांच्या बाबतीत काय विचार करते, ते समजत नाही. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही रेल्वेखाते याबाबत ठोस निर्णय का बर घेत नाही.
– उमा शिंदे, प्रवासी, पालघर

सध्या फ्लाईंग राणीला दिलेला महिलांचा डबा अत्यंत लहान असून त्यामध्ये जेमतेम ४० ते ५० महिलाच प्रवास करू शकतात. पालघर ते डहाणू असा रोजचा प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या तीनशे ते चारशे आहे. एवढ्याशा डब्यात इतक्या महिला कशा काय सामावू  शकणार, रेल्वेच्या आडमुठेपणामुळे महिला वर्गाला रोज विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोजचा प्रवास करणाऱ्या महिलांनी गेल्या वर्षभरात स्वाक्षरी मोहीम राबवून पाच वेळा रेल्वे डीआरएम कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. हे दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन अडचणींचा पाढा संबंधित अधिकाऱ्यांसमोर वाचला असतानासुद्धा महिलांना होणाऱ्या त्रासाची रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याबद्दल समस्त महिला वर्गात रेल्वे प्रशासनाच्या धोरणाबाबत नाराजी आहे.

जनरल डब्यात सर्व पुरुष गेल्यानंतरच आम्हाला डब्यात प्रवेश करणे शक्य होते. त्यामुळे आम्हाला बसायला जागा मिळत नाही. संपूर्ण प्रवास आम्हाला उभ्यानेच करावा लागतो. महिलांसाठी जे स्वतंत्र डब्बे यापूर्वी होते, ते पुन्हा द्या.
– स्वाती दळवी, प्रवासी, डहाणू

हेही वाचा –

राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा