घरपालघरप्रसिध्द महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा बैठक

प्रसिध्द महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा बैठक

Subscribe

भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात डहाणू तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकारी वर्ग , ट्रस्ट तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी पहिली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

डहाणू: डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा २३ एप्रिल पासून सुरू होणार आहे .या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदिर ट्रस्ट कार्यालयात डहाणू तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकारी वर्ग , ट्रस्ट तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी पहिली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. महालक्ष्मी देवीची यात्रा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर, ठाणे, मुंबई , नाशिक बरोबरच गुजरात राज्यातील हजारो भाविक या निमित्ताने येथे येत असतात. सतत १५ दिवस चालणार्‍या या यात्रेत लाखो भाविक येतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ही आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीस डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख, नायब तहसीलदार पूजा भोईर,डहाणू पंचायत गट विकास अधिकारी एच आर गरीबे,डहाणू बांधकाम विभागाचे अधिकारी गुणवंत जळकोटे , कासा पोलीस निरिक्षक नामदेव बंडगर , डहाणू पोलीस प्रमुख रणवीर बयेस, महावितरण अधिकारी व आरोग्य, विद्युत, बांधकाम, पशुवैद्यकीय, महसूल, अधिकारी, दुकानदार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -