Eco friendly bappa Competition
घर पालघर शिक्षक आंतर जिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण

शिक्षक आंतर जिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण

Subscribe

पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असला तरी येथे मंजूर असलेल्या 7300 शिक्षक पदांपैकी 2000 पदे आजही रिक्त आहेत. शिक्षकांची जवळपास 27% पदे रिक्त आहेत.

पालघर: जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या आंतर जिल्हा बदल्यांमधील गुंतागुंत सोडवण्यासाठी राज्य सरकारने सुधारित धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार दहा टक्क्यांपेक्षा जास्त रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदली करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्यामुळे पालघर जिल्हा परिषदेतील आंतर जिल्हा बदलीवर यापुढे रोख्य लागणार आहे. त्यामुळे अशा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना आता नवीन निर्णयानुसार सोडता येणार नाही.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने तसेच जिल्ह्यामध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडू नये असा निर्णय ग्रामविकास विभागामार्फत 23 मे रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असला तरी येथे मंजूर असलेल्या 7300 शिक्षक पदांपैकी 2000 पदे आजही रिक्त आहेत. शिक्षकांची जवळपास 27% पदे रिक्त आहेत.

त्यातच 467 शिक्षक आंतर जिल्हा बदलीने इतर जिल्ह्यात तर त्यानंतर आणखीन 200 च्या जवळपास शिक्षकांची आंतर जिल्हा बदली होणार आहे. एकंदरीत जिल्ह्यात सुमारे 700 पदे रिक्त होणार आहेत. हे शिक्षक इतर जिल्ह्यात जात असले तरी त्यांच्या बदलीने पालघर जिल्ह्यात येणार्‍या शिक्षकांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर पेक्षा जास्त शाळा बंद राहणार असल्याची शक्यता आहे. तर 300 पेक्षा जास्त शाळा एक शिक्षकी होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

- Advertisement -

 

शिक्षक बदलीसाठी इतके आग्रही का ?

- Advertisement -

पालघर जिल्ह्याच्या शिक्षक भरती संदर्भातील अनेक प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर बोईसर येथे त्यांच्या दौर्‍यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी शिक्षण विभागाच्या मंत्रालयातील उच्च अधिकार्‍यांना फोन द्वारे संपर्क साधून या प्रकरणात तातडीने लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबत जोरदार हालचाली मंत्रालय स्तरावर सुरू असल्याचे समजते. जिल्ह्यातील सुमारे 700 शिक्षक आंतर जिल्हा बदलीने पालघर जिल्ह्याच्या बाहेर इतर जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत. शाळांची व शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेता त्यांना सद्यस्थितीत कार्यमुक्त करण्यात आलेले नाहीत. मात्र हे शिक्षक बदलीसाठी अतिआग्रही असल्याचे समजते. शिक्षण संचालक कार्यालयामार्फत आलेल्या पत्रानुसार ही बदलीची प्रक्रिया ऑगस्टपर्यंत राबवण्याचे सांगण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.मग हे शिक्षक बदलीसाठी इतके आग्रही का आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -