घरपालघररिक्षाचालकांची मनमानी सुरुच; आरटीओचा आदेश धाब्यावर

रिक्षाचालकांची मनमानी सुरुच; आरटीओचा आदेश धाब्यावर

Subscribe

आरटीओकडून निर्देशही जारी करण्यात आले. पण, बुधवारी रिक्षाचालकांनी आरटीओचे आदेश धाब्यावर बसवत प्रवाशांची अडवणूक करत वाढीव दराप्रमाणेच आकारणी करून मनमानी सुरुच ठेवल्याचे दिसून आले.

मंगळवारी रिक्षाचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तीन प्रवाशी वाहतूक करताना मूळचेच भाडे आकारण्यावर एकमत झाले. त्यानंतर आरटीओकडून निर्देशही जारी करण्यात आले. पण, बुधवारी रिक्षाचालकांनी आरटीओचे आदेश धाब्यावर बसवत प्रवाशांची अडवणूक करत वाढीव दराप्रमाणेच आकारणी करून मनमानी सुरुच ठेवल्याचे दिसून आले आहे. कोरोना काळात दोन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी असल्याने रिक्षाचालकांनी दुप्पट भाडेवाढ केली होती. आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर रिक्षाचालकांना तीन प्रवाशी वाहतूक करण्याची मूभा देण्यात आली आहे. असे असले तरी रिक्षाचालकांनी दुप्पट केलेली दरवाढ तशीच ठेवत तिनही प्रवाशांकडून वाढीव दरानेच आकारणी सुरु ठेवली आहे. इतकेच नाहीतर चौथा प्रवाशी बसवून वाढीव भाडे आकारणे सुरु ठेवले आहे.

दोनऐवजी चार प्रवाशी वाहतूक करणारे रिक्षाचालक कोरोनाच्या काळात वाढवलेले दरच आकारत असल्याने वसई विरार परिसरातील प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. वसई विरार परिवहन विभागाची बससेवा सर्वच उपलब्ध नाही. त्यातच एसटीचा संपही अद्याप मिटलेला नाही. त्याचा फायदा उचलत रिक्षाचालक अडवणूक करून प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करू लागले आहेत. या विरोधात वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेने १ डिसेंबरपासून पाच दिवस रिक्षावर बहिष्कार आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आरटीओच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. त्यात पूर्वीप्रमाणेच दर आकारण्याचा निर्णय झाला होता.

- Advertisement -

मात्र, दुसऱ्या दिवशी दरावरून प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होऊ लागला. जादा दरानेच भाडे द्यावे लागेल, अशी अडवणूक रिक्षाचालक करत आहेत. जो कुणी कमी पैशात घेऊन जात असेल तर त्याच्या रिक्षात जाऊन बसा, असे उर्मट उत्तर रिक्षाचालक देत असल्याने प्रवाशी संतापले आहेत. रिक्षाचालक जर आरटीओ या सरकारी यंत्रणेलाच जुमानत नसतील तर त्यांची मग्रूरी मोडीत काढण्यासाठी बहिष्कार आंदोलन करूच, असा इशारा वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेने दिला आहे.

हेही वाचा –

WhatsApp Update : २० लाखाहून अधिक भारतीयांचे व्हॉट्सअप बंद, नेमकं कारण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -